घरदेश-विदेशराष्ट्रवादीचं बंद पडलेलं 'घड्याळ' तर काँग्रेसचा 'ढोंगीपणा'; स्मृती इराणींची बोचरी टीका

राष्ट्रवादीचं बंद पडलेलं ‘घड्याळ’ तर काँग्रेसचा ‘ढोंगीपणा’; स्मृती इराणींची बोचरी टीका

Subscribe

राष्ट्रवादीने अगोदर घर सांभाळावं, असा टोला केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रवादीवर लगावला. तसचं, गरीब, दलित, शोषितांबद्दल कळवळा व्यक्त करणाऱ्या कॉंग्रेसचा ढोंगीपणा विविध मुद्यांवर उघडकीस आल्याने त्यांचा करिष्मा चालणार नाही, असं स्पष्ट मत ईराणी यांनी व्यक्त केलं.

बंद पडलेले घड्याळ आता कर्नाटकातील निवडणूक रिंगणात उतरले आहे. प्रचारासाठी आज जयंत पाटील आले होते. तर शरद पवार ही येणार असल्याचे समजते. निपाणीच्या माहेरवाशीण असणाऱ्या शशिकला जोल्ले या निपाणी मतदार संघ सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. तुम्हाला सोडून लोक चालले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने अगोदर घर सांभाळावं, असा टोला केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रवादीवर लगावला. ( NCP s stopped clock and Congress s hypocrisy Smriti Irani s criticism of NCP Congress )

तसचं, गरीब, दलित, शोषितांबद्दल कळवळा व्यक्त करणाऱ्या कॉंग्रेसचा ढोंगीपणा विविध मुद्यांवर उघडकीस आल्याने त्यांचा करिष्मा चालणार नाही, असं स्पष्ट मत ईराणी यांनी व्यक्त केलं.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकारची कामगिरी देशात चमत्कारिक ठरली असून, विकास कामांत भारी ठरलेल्या मंत्री शशिकला जोल्ले यांचा विजयाचा वारु कुणीही रोखू शकणार नाही, असा दावाही स्मृती इराणी यांनी केला.

मंगळवारी सायंकाळी येथील व्हीएसएम हायस्कूलच्या मैदानावर भाजप उमेदवार मंत्री जोल्ले यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. प्राध्यापक विभावरी खांडके यांनी स्वागत केलं. मंत्री ईराणी म्हणाल्या, घड्याळ बंद पडल्याने राष्ट्रवादीतील लोक पक्षातून बाहेर पडत आहेत, यामुळे राष्ट्रवादीने आधी आपलं घर सांभाळावं. कर्नाटकात लिंगायत व इतर समाजाला आरक्षण दिल्याने कॉंग्रेसला इतकी पोटतिडीक कशासाठी? असा सवालही इराणी यांनी यावेळी केला.

- Advertisement -

कोरोना काळात जीव धोक्यात घालून आमदार शशिकला जोल्ले या लोकांना धीर देत होत्या. यावेळी येथील अनेक नेते मंडळी घरात होते. तर या कालात पंतप्रधान मोदींनी गरिबांना मोफत धान्य, औषध पुरवठा केला. तसंचं, प्रत्येकाला कोरोना लसीचे दोन डोस दिले. त्यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी मतदान पेटीतून विरोधकांना इंजेक्शन द्या. निपाणीच्या माहेरवाशीण असणाऱ्या शशिकला जोल्ले या घरच्या मुलीचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना हद्दपार करा असे आवाहनही मंत्री इराणी यांनी केले.

( हेही वाचा: महाविकास आघाडीत बिघाडी? 2024 साठी आमचा प्लॅन तयार; कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान )

यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, अजित गोपचडे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा निता बागडे, वृषभ जैन, शाभंवी अश्वतपूर, भारती मगदूम, बसवप्रसाद जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, प्रणव मानवी, पवन पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -