घरदेश-विदेशAssembly Election 2021: बंगालच्या 'वाघिणी'ला शरद पवारांच्या एका पत्रामुळे मिळालं बळ

Assembly Election 2021: बंगालच्या ‘वाघिणी’ला शरद पवारांच्या एका पत्रामुळे मिळालं बळ

Subscribe

शरद पवारांच्या पत्रामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जींच्या प्रचार अभियानात वाढला जोर

देशात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांसह पद्दुचेरी या एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकांना सुरूवात झाली असून आज पश्चिम बंगाल येथे निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीची रणधुमाळी या राज्यात पाहायला मिळत आहे. या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा विरोध नाकारत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देणारे पत्र पाठवले आहे. शऱद पवारांच्या एका पत्रामुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठे बळ मिळाले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बँनर्जींच्या निवडणुकीच्या प्रचारमोहीमेत रंगत वाढली असून जोर वाढल्याचेही दिसतेय.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांच्या अध्यक्षांना समर्थन देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. यावेळी ममतांनी देशातील १५ राजकीय पक्षांना पत्र लिहून भाजपाच्या विरोधात समर्थन देऊन एकत्र येण्याचे आवाहन पत्राद्वारे केले होते. भाजपाविरोधात एकत्रित येऊन निवडणुकीची लढाई लढावी, असं आवाहन ममता बॅनर्जींनी इतर राजकीय पक्षांना केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत देशातील कित्येक राजकीय पक्षांनी ममता बॅनर्जींना आपला पाठिंबा असल्याचे पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील काँग्रेसची ताकद पाहता सर्व पक्षांनी एकत्रित येऊन भाजपाविरोधात नारा देत आवाज बुलंद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासह पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात होणाऱ्या प्रचारसभेत शरद पवार पश्चिम बंगालमध्ये भेट देतील, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव हे ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहे. तर भाजपाच्या पदरी निराशा पाडण्यासाठी ममता बॅनर्जी वाटेल ते करण्याच्या तयारीत असून भाजपाला हरवण्यासाठी त्यांनी चंग बांधल्याचे दिसतेय.

‘या’ १५ राजकीय नेत्यांना दीदींचे पत्र

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक प्रचाराची रंगत वाढली असताना ममता बॅनर्जींनी भाजपाच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्रित येण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, शरद पवार, DMK चे एमके स्टॅलिन, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक, वाय. एस रेड्डी, माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला, माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती आणि दीपांकर भटाचार्य यांना ममता यांनी पत्र लिहून भाजपा विरोधातील लढाईत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

असे लिहिले पत्र…

ममता बॅनर्जी यांनी नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ इंडिया विधेयकाचाही उल्लेख केला आहे. हे विधेयक संघ व्यवस्थेच्या विरोधात असल्याचं ममता बॅनर्जी यांनी पत्रात नमूद केले आहे. भाजप हे केवळ दिल्लीच्याबाबत करत नाही. तर संपूर्ण देशात हाच प्रकार सुरू आहे. गैर भाजपाशासित राज्यांमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून समस्या निर्माण केल्या जात आहेत, असे सांगतानाच नियोजन आयोगाचे नाव नीती आयोग ठेवल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -