घरदेश-विदेशअमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Subscribe

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज दुपारी गांधीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. ते गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी एनडीए घटकपक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. तसेच भाजपचे मित्रपक्ष शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेदेखील यावेळी तेथे हजर होते.

- Advertisement -

भाजप अध्यक्ष अमित शहा आज गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी एनडीए घटक पक्षातील सर्व प्रमुख नेते आज गांधीनगरमध्ये उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या २६ च्या २६ जागा मोदींच्या झोळीत टाका, असे आवाहन तेथील जनतेला केले. गुजरातचा मुख्यमंत्री आज देशाचा लाडका नेता ठरला आहे. भाजपा एक विचारधारेची पार्टी आहे. ५० कोटी गरिबांच्या जीवनात उजेड भाजपाने पाच वर्षात आणला. देशाला फक्त मोदी आणि भाजपा एनडीएची सुरक्षा करू शकते. मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा बनायला जात आहे. त्यासाठी गुजरातच्या लाडक्या नेत्याला पुन्हा पंतप्रधान करा, असे आवाहन अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात केले. देश फक्त भाजपाच्या हातात सुरक्षित राहू शकतो, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

गांधीनगरमध्ये एनडीएचं शक्तीप्रदर्शन

भाजप अध्यक्ष अमित शहा आज, शनिवारी गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी आज भाजप तसेच एनडीएचे वरिष्ठ नेते आणि पक्ष प्रमुख गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून एनडीएचे घटकपक्षातील एक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याकरता आज अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. गांधीनगर येथे भाजपने मोठी सभा आयोजित केली असून यावेळी व्यासपिठावर अमित शहा, उद्धव ठाकरे, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, रामविलास पासवान, प्रकाशसिंग बादल, पियुष गोयल आदी नेतेमंडळी उपस्थित आहेत. त्यानंतर अमित शहा दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज सभेला सुरुवात करण्यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -