घरताज्या घडामोडीभूकंपग्रस्त तुर्कीच्या यशस्वी ऑपरेशननंतर NDRFटीम भारतात, हिंडन विमानतळावर केलं स्वागत

भूकंपग्रस्त तुर्कीच्या यशस्वी ऑपरेशननंतर NDRFटीम भारतात, हिंडन विमानतळावर केलं स्वागत

Subscribe

तुर्की आणि सीरियातील भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. भूकंपामुळे 41 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तुर्कीच्या मदतीसाठी भारतातून NDRFटीम पाठवण्यात आली होती. मात्र, भूकंपग्रस्त तुर्कीच्या यशस्वी ऑपरेशननंतर हीच NDRF टीम भारतात दाखल झाली आहे. यावेळी या टीममध्ये डॉग स्क्वाडचे सदस्य रॅम्बो आणि हनी यांचाही समावेश आहे. याशिवाय भारतात परतलेले 47 सदस्यही आहेत.

6 फेब्रुवारीला तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर 24 तासांच्या आत भारताने NDRF टीम पाठवून तुर्कीमध्ये ऑपरेशन सुरू केले होते. भूकंपानंतर तुर्कस्तानला पोहोचलेल्या एनडीआरएफच्या ८व्या बटालियनच्या जवानांनी आपल्या धाडसी कृतीने अनेकांचे प्राण वाचवले. सुमारे 10 दिवस ऑपरेशन दोस्त यशस्वीपणे चालवून NDRF टीम आज भारतात परतली आहे. NDRF जवानांचे पहिले C-17 ग्लोबमास्टर विमान सकाळी 9:00 वाजता गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर पोहोचले. येथील विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

ऑपरेशन दोस्त यशस्वी केल्याबद्दल भारतात परतलेल्या NDRF टीमचे हिंडन हवाई दलातील उच्च NDRF अधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले. हिंडन विमानतळावरून हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर एनडीआरएफचे जवान गोविंदपुरम येथील बटालियनकडे रवाना झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणारा संशोधक नक्की कोण आहे? आता भारताच्या बाबतीत केलं भाकित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -