नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे (Dattatreya Hosabale) ‘अमृतशतम्’ व्याख्यानमालेत उपस्थितांनासंबोधित करताना म्हटले की, भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना प्रबळ करणे आवश्यक आहे. (Need to strengthen the spirit of nationalism among Indians RSS leader Dattatreya Hosable)
केसरी साप्ताहिकाकडून आयोजित केलेल्या ‘अमृतशतम्’ व्याख्यानमालेत संबोधित करताना होसाबळे म्हणाले की, भारत मानवतेसाठी जगतो. भारताचे ध्येय आहे की, सांस्कृतिक मूल्ये आणि जीवनाची अनोखी दृष्टी यासह जगाला प्रकाशमान करणे. यासाठी भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना प्रबळ करणे आवश्यक आहे. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून हे सत्यात रुपांतर केले आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात संघ नवजात टप्प्यात होता आणि स्वातंत्र्यानंतर त्याचे राष्ट्रीय संघटनेत रूपांतर झाले, असेही होसाबळे म्हणाले.
India lives for humanity – Dattatreya Hosabale Ji
Kozhikode (VSK). RSS Sarkaryavah Dattatreya Hosabale Ji said that India lives for humanity. India’s mission is to shed light as a beacon to the world with its cultural values and unique vision of life.https://t.co/VtJjVZfaXr pic.twitter.com/MasaQJxEmC
— VSK BHARAT (@editorvskbharat) August 17, 2023
आरएसएसचा राष्ट्रीय संघटनात्मक शक्ती बनण्याचा इतिहास
होसाबळे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्यलढ्यात उदय होऊन स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय संघटनात्मक शक्ती बनण्याचा इतिहास आहे. जोपर्यंत संघाच्या संस्थापकाचे जीवन समजून घेत नाही तोपर्यंत संघाचा इतिहास समजू शकत नाही. आदर्श राष्ट्राची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हेडगेवार यांनी आयुष्याचा प्रत्येक इंच समर्पित केला, अशी माहिती होसाबळे यांनी दिली.
हेही वाचा – आर्थिक लाभासाठी काही डॉक्टर आपला पेशा बदनाम करतायत, ओरिसा हायकोर्टाची टिप्पणी
डॉ. हेडगेवार जन्मजात देशभक्त होते
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याबद्दल बोलताना होसाबळे म्हणाले की, डॉ. हेडगेवार हे जन्मजात देशभक्त होते. त्यांचा लहानपणापासूनच स्वातंत्र्यलढ्यात सहभाग होता. बाळ गंगाधर टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या मालिकेने प्रेरित होऊन हेडगेवार यांनी विविध क्रांतिकारी कार्यातही भाग घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून “राष्ट्रीय अभिमान” प्राप्त करणे, हे हेडगेवार यांचे उद्दिष्ट असल्याचेही होसाबळे यांनी सांगितले.
हेही वाचा – Prayagraj Crime : मदरशामध्ये तिरंगा ध्वजावर वाढला नाश्ता; पाच जणांवर गुन्हा दाखल
संस्थेच्या माध्यमातून राष्ट्राभिमान मिळवण्याचा उद्देश
सांस्कृतिक आधार असलेले संघटित राष्ट्र झाल्याशिवाय स्वातंत्र्य मिळविणे शक्य नाही आणि स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने राष्ट्राच्या आदर्शातून प्रेरणा घेतली पाहिजे, असे हेडगेवार यांचे मत होते, अशी माहिती देताना होसबळे म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून राष्ट्राभिमान मिळवण्याचा उद्देश आहे.