घरक्रीडाकुस्तीपटूंच्या लैंगिक छळाप्रकरणी नीलम गोऱ्हेंचे क्रीडामंत्र्यांना पत्र, विशाखा समितीची मागणी

कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाप्रकरणी नीलम गोऱ्हेंचे क्रीडामंत्र्यांना पत्र, विशाखा समितीची मागणी

Subscribe

Neelam Gorhe's letter to Sports Minister | आता या प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही एन्ट्री घेतली असून क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून ब्रिजभूषण सिंह यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Neelam Gorhe’s letter to Sports Minister | मुंबई – ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपट्टूंचे मानसिक आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात वातावरण तापलं आहे. विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिकसह अनेक महिलांनी याविरोधात आवाज उठवला असून आंदोलनही केले आहे. आता या प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही एन्ट्री घेतली असून क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून ब्रिजभूषण सिंह यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘त्या’ प्रकाराला राजकीय रंग देऊ नका; कुस्तीसम्राट काझा यांनी ठणकावले

- Advertisement -

ब्रिजभूषण सिंह हे कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष आहेत. त्यांनी ३० भारतीय महिला कुस्तीपटूंचे शारिरीक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी ३० कुस्तीपट्टूंनी जंतरमंतर मैदानावर १८जानेवारी रोजी निदर्शनेही केली. यापार्श्वभूमीवर डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय क्रीडमंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून याप्रकरणाची चौकशी करण्याकरता समिती स्थआपन करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपींवर कठोर कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

- Advertisement -
  • केंद्रीय आणि राज्याच्या क्रीडा विभागात लैंगिक शोषणाच्या घटना थांबवण्यासाठी विशाखा समिती स्थापन करावी.
  • महिला खेळाडूंसाठी महिला प्रशिक्षकच नेमावेत.
  • राज्यस्तरीय समिती स्थापन करून क्रीडा प्रकारानुसार उपसमित्या स्थापन करावे.
  • याबाबत महाराष्ट्रातही सर्व सूचना लागू व्हाव्यात.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये मेरी कोम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि दोन वकिलांचा समावेश आहे.

दरम्यान, WFI (Wrestling Federation of India) चे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, WFI ची सर्व कार्यप्रणाली थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा इराकमध्ये फुटबॉल स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; एक ठार, अनेकजण जखमी

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -