घरक्रीडाजागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला सिल्वर मेडल

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला सिल्वर मेडल

Subscribe

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भाला फेक प्रकारात नीरज चोप्राने सिल्वर मेडल पटकावले. त्याने चौथ्या प्रयत्नात नीरजकडून 88.13 मीटर भालाफेक केली. भारताला जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत 19 वर्षांनंतर पदक मिळाले. यापूर्वी लांब उडीमध्ये बॉबी जॉर्जने पदक जिंकले होते. या स्पर्धेत ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सनने सुवर्ण पदक पटकावले. त्याने 90.54 मीटर भाला फेकला.

- Advertisement -

यापूर्वी नीरज चोप्राने 2016 मध्ये ज्यूनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावले होते. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांने सुवर्ण पदक जिंकले होते. नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात फाऊल केला. मात्र, सुवर्ण गतविजेता अँडरसन पेटर्सने पहिल्याच प्रयत्नात 90.21 मीटर भालाफेक करत नीरज चोप्रासमोर मोठे आव्हान ठेवले. त्यानंतर नीरजने 82.39 मीटर भाला फेकला. त्यामुळे तो यादीत चौथ्या स्थानावर पोहचला.

ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सने दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकासाठी नीरज समोर अजून मोठे आव्हान ठेवले. पाचव्या स्थानावर घसरलेल्या नीरज चोप्राने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर भाला फेकून आपली कामगिरी सुधारली. तो तिसऱ्या प्रयत्नानंतर तो पुन्हा चौथ्या क्रमांकावर आला.

- Advertisement -

 

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -