Neeri’s gargling कोरोना टेस्ट किटला DCGI ची मंजुरी

Neeri’s gargling test kit gets DCGI nod
Neeri’s gargling कोरोना टेस्ट किटला DCGI ची मंजुरी

कोरोना चाचणी करण्यासाठी RT-PCR किंवा रॅपिड अँटिजेन टेस्टचा वापर केला जातो. परंतु आता नागपूरच्या निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्राने (National Environmental Engineering Research Institute) यावर एक नवीन पर्याय शोधून काढला आहे. या संशोधनानुसार आता थुंकीद्वारे कोरोनाची चाचणी करत येणार आहे. या Neeri’s gargling कोरोना टेस्ट किटला आता Drugs Controller General of India ( DCGI नेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज भासणार नाही. तर फक्त गुळण्या करूनच नमुने देता येतील.

नागपूरच्या नॅशनल एनव्हायरमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (NEERI) शास्त्रज्ञांनी काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) अंतर्गत आरटी-पीसीआर टेस्टचा हा नवा मार्ग शोधला आहे. त्यांनी सलाइन गार्गल टेस्ट तयार केली आहे.. निरीच्या या संशोधनाला ICMR नेही यापूर्वी मान्यता दिली आहे. त्यामुळे य़ा किटच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. या कोरोना चाचणी पद्धतीमुळे वेळ आणि खर्चातही बचत होणार आहे.

गुळण्यांमार्फत कशी होणार कोरोना टेस्ट

सलाईनच्या बॉटलमध्ये एक ट्युब असते. सलाईन बॉटलमधील ग्लुकोजचे पाणी तोंडात घेऊन त्याची १५ सेकंद गुळण्या कराव्या लागतात. त्यानंतर गुळण्या केलेलं तोंडातील पाणी या ट्युबमध्ये थुंकायचं आहे. गुळण्या केलेली थुंकी एका बाटलीमध्ये घेतली जाते. त्यानंतर हे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले जातात. लॅबमध्ये निरीने तयार केलेल्या विशेष सोल्युशनमध्ये रूम टेम्प्रेचरमध्ये हे सॅम्पल ठेवलं जाते. सोल्युशन गरम झाल्यावर RNA टेम्प्लेट तयार होईल. हे सोल्युशन रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमेरेज चेन रिअॅक्शन म्हणजेच आरटी-पीसीआर साठी जाईल. HiMedia Laboratories Pvt Ltd मार्फत या किटचे उत्पादन केले जाणार आहे.

यापूर्वी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) या टेस्टला परवानगी दिली आहे. यामार्फत कोणतीही व्यक्ती फक्त तीन तासांत कोविड टेस्ट करू शकते. कोरोना टेस्टची ही पद्धत गेमसेंजर ठरेल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला. नागपूर नगर निगम (एनएमसी) आणि नागपूर जिल्हा परिषद व्यतिरिक्त खाजगी प्रयोगशाळेनेही या आरटी-पीसीआर चाचणी किटचा उपयोग सुरु केला आहे.