घरदेश-विदेशशहीद जवान रविंद्र संब्याल यांची पत्नी बनली लेफ्टनंट

शहीद जवान रविंद्र संब्याल यांची पत्नी बनली लेफ्टनंट

Subscribe

शहीद जवान रविंद्र संब्याल यांची पत्नीने घेतलेल्या धाडसी निर्णयाचे देशभरातून कौतुक केले जात आहे. मुलीसमोर आदर्श निर्माण व्हावा तसेच पतीने केलेली देश सेवा पुढा चालू राहावी यासाठी नीरु संब्याल यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला.

साताऱ्याच्या शहीद जवान संतोष महाडीक यांच्या पत्नी स्वाती महाडीक यांनी ज्याप्रमाणे पतीच्या मृत्यूनंतर सैन्यात जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आणखी एका अशाच शूर वीर पत्नीने देखील सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीर मरण आलेल्या रवींद्र संब्याल यांची पत्नी नीरु संब्याल लेफ्टनंट झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यामध्ये नीरु संब्याल कुटुंबासोबत राहतात. पतीच्या विरमरणानंतर नीरु यांनी दु:ख न मानता खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि लष्करामध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत.

- Advertisement -

सैन्यात जाण्याचा घेतला धाडसी निर्णय

लेफ्टनंट नीरु संब्याल यांचे पती रविंद्र संब्याल भारतीय सैन्यात रायफलमॅन म्हणून रुजू होते. २०१५ मध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ते शहीद झाले होते. रविंद्र संब्याल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी जबाबदारी नीरु यांच्यावर आली. पती रविंद्र यांनी देशसेवेसाठी केलेले कार्य पुढे चालू राहावे तसंच मुलीसाठी त्यांनी जिद्दीने सैन्यामध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आर्मीचे ट्रेनिंग पूर्ण केले आणि आता त्या लेफ्टनंट या पदावर रुजू झाल्या आहेत.

मुलीसमोर आदर्श निर्माण केला

पतीच्या निधनानंतर नीरु संब्याल निराश झाल्या होत्या. पण माझी चार वर्षाची मुलगी माझ्यासाठी प्रेरणा ठरली. माझ्या मुलीसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी मी सैन्यात रुजू होण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मेहनत करुन आता त्या सैन्यात लेफ्टनंट पदावर आहेत. सैन्यात काम करण्यासाठी मानसिकदृष्ट्या कणखर असणं अतिशय महत्त्वाचं असल्याचे नीरू यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -