Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश NEET 2021 Registration: आजपासून NEET परीक्षेसाठी नोंदणी सुरू; जाणून घ्या परीक्षा फी...

NEET 2021 Registration: आजपासून NEET परीक्षेसाठी नोंदणी सुरू; जाणून घ्या परीक्षा फी व वयोमर्यादा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी (यूजी) म्हणजे कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे प्रलंबित असलेल्या एनईईटी २०२१ च्या नवीन परीक्षा व नोंदणी तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी केली. शिक्षणमंत्र्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार नीट २०२१ ची परीक्षा १२ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे आणि नीट २०२१ रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आजपासून म्हणजेच १३ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरू होणार आहे. यापूर्वी, राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (एनटीए) १ ऑगस्ट रोजी एनईईटी परीक्षा घेण्याची घोषणा केली होती, देशभरातील उमेदवारांच्या मागणीमुळे आणि कोरोनाच्या परिस्थितीमुळे जवळपास दीड महिन्यांनी वाढ करण्यात आली आहे.

कुठे आणि कसा करा अर्ज

नीट २०२१ रजिस्ट्रेशन एनटीएद्वारे या परीक्षेसाठी तयार केलेल्या पोर्टल, ntaneet.nic.in वर करता येते. सायंकाळी ५ नंतर या पोर्टलवर उमेदवारांना होम पेजवरच भरलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करून एनईईटी २०२१ अप्लीकेशन पेजवर पाठवता येणार आहे. त्यानंतर उमेदवारांना दिलेल्या सूचना वाचून त्यांना पुढे जावे जावे लागणार आहे. त्यानंतर नव्या पेजवर विचारले जाणारे तपशील भरून, उमेदवारांना एनईईटी नोंदणी २०२१ पूर्ण करता येणार आहे.

जाणून घ्या परीक्षा शुल्क आणि वय मर्यादा

- Advertisement -

नीट २०२१ रजिस्ट्रेशनसाठी इच्छुक उमेदवारांना अर्जाच्या वेळी त्यांना ऑनलाईन माध्यमातून १५०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तसेच जनरल कटेगरीतील ईडब्ल्यूएस आणि ओबीसी (एनसीएल) उमेदवारांसाठी अर्ज फी १४०० रुपये असून अनुसूचित जाती, एसटी, पीडब्ल्यूडी आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी ८०० रुपये फी असणार आहे. मागील वर्षाच्या अधिसूचनेनुसार, नीट २०२१ च्या परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांचा जन्म ३१ डिसेंबर २००४ नंतरचा नसणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ती वयोमर्यादा लक्षात घ्यावी. ही कट ऑफ सर्व श्रेणी उमेदवारांसाठी समान असणार आहे.


रशियन Sputnik-v देशातील ५० शहरांत उपलब्ध, तुमच्या शहरात मिळतेय?
- Advertisement -