घरताज्या घडामोडीNEET Result 2021 Date: लवकरचं घोषित होणार NEET परीक्षांचे निकाल, निकाल पाहण्यासाठी...

NEET Result 2021 Date: लवकरचं घोषित होणार NEET परीक्षांचे निकाल, निकाल पाहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Subscribe

neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही NEET परीक्षांचे निकाल पाहू शकता

NEET UG 2021च्या परीक्षांचे निकाल लवकरचं  NTA (National Testing Agency) द्वारे निकाल घोषित करण्यात येणार आहेत. neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही NEET परीक्षांचे निकाल पाहू शकता. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याआधी NTA ने NEET UG 2021 साठी ऑनलाईन अर्जामध्ये वेळेची मर्यादा वाढवण्यासाठी नोटिफिकेशन काढले होते. परीक्षांना उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबर पर्यंत आपल्या अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी वेळ देण्यात आला होता जो वेळा आता संपला आहे. NTAकडून येणाऱ्या दिवसांमध्ये राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा २०२१च्या प्रारंभिक उत्तरे देखील जाहीर करण्याची शक्यता आहे.

NEET २०२१च्या परीक्षांचे अर्जाची सुधार सुविधा १३ ऑक्टोबर रोजी बंद करण्यात आली आहे. मात्र NTA यात बदल करुन सुधार सुविधा एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभिक प्रश्न जाहीर केल्यानंतर उमेदवार neet.nta,nic.in किंवा ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन डाऊनलोड करू शकता.

- Advertisement -

प्रिलियम्स आन्सर की जाहीर झाल्यानंतर परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना त्यात काही त्रुटी असतील तर त्यासाठी वेळ देण्यात येईल. प्रश्नांबाबत काही आक्षेप किंवा प्रश्न असेल तर त्याबाबत उमेदवार अधिकृत वेबसाईटवर मदत मागू शकतात. यात जर काही त्रुटी आढळून आल्या तर त्याबाबत फायनल उत्तरे जाहीर करण्यात येतील. उत्तरांच्या आधारे विद्यार्थी त्यांचा गुणांचा अंदाज लावू शकतात.

NEET Answer Key 2021 कशी डाऊनलोड कराल?

  • NEETच्या neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर लिंक एक्टिव्ह झाल्यानंतर होमपेजवर Result अशी लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर लॉग इन करण्यासाठी क्रेडिंशल्स भरुन सबमिट करा.
  • त्यानंतर रिसल्ट तुम्हाला स्क्रिनवर दिसेल. तिथून तुम्ही तो डाऊनलोड करुन हवी असल्यास त्याची प्रिंट काढू शकता.

हेही वाचा – आयकर विभागाने करदात्यांना पाठवले ८४,७८१ कोटी, तुमच्या खात्यात जमा झाले का पैसे?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -