घरदेश-विदेशमार्क शून्य तरीही होणार डॉक्टर

मार्क शून्य तरीही होणार डॉक्टर

Subscribe

नीट परीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना एक अथवा दोन विषयांमध्ये शून्य मार्क्स मिळूनही एमबीबीएसच्या कोर्सला अॅडमिशन मिळाल्याचं समोर आलं आहे. नीटच्या परीक्षेमध्ये ४०० विद्यार्थ्यांना दोन अंकी मार्क्स मिळाले असून११० विद्यार्थ्यांना शून्य मार्क्स मिळाले आहेत.

देशातील शैक्षणिक व्यवस्थेचा बोजवारा वाजल्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे २०१७ साली घेण्यात आलेला एमबीबीएसचा प्रवेश. नीट परीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना एक अथवा दोन विषयांमध्ये शून्य मार्क्स मिळूनही एमबीबीएसच्या कोर्सला अॅडमिशन मिळाल्याचं समोर आलं आहे. नीटच्या परीक्षेमध्ये ४०० विद्यार्थ्यांना दोन अंकी मार्क्स मिळाले असून११० विद्यार्थ्यांना शून्य मार्क्स मिळाले आहेत. तरीही या विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळाला असल्याचं समोर आलं आहे.

जास्त विद्यार्थी खासगी मेडिकल कॉलेजात

जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश हा खासगी मेडिक कॉलेजात मिळाला आहे. त्यामुळं शून्य मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असेल तर, परीक्षा घेण्याची काय गरज आहे? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. २०१७ मध्ये १५० पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या साधारण १,९९० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून ५३० विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री या दोन्ही विषयात शून्य मार्क्स मिळाले असल्याचं वृत्त आहे.

- Advertisement -

दरवर्षी मिळतात १७ लाख

२०१७ साली ६० हजार जागांसाठी ६.५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी यासाठी अपात्र ठरले. त्यातील ५ लाख ३० हजार ५०७ विद्यार्थ्यांना खासगी मेडिकल कॉलेजात प्रवेश देण्यात आला. या विद्यार्थ्यांनी ट्यूशन शुल्क म्हणून प्रत्येक वर्षी १७ लाख रुपये भरले. यामध्ये हॉस्टेल, लायब्ररी आणि इतर खर्चांचा समावेश आहे. दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून १७ लाख मिळत असल्यामुळंच खासगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान सुरुवातीला कॉमन एन्ट्रन्स एक्झामसाठी काढण्यात आलेल्या सूचनेमध्ये प्रत्येक विषयात कमीत कमी ५० टक्के आणणं अनिवार्य होतं. मात्र नंतर पर्संटाईल सिस्टिम आल्यावर प्रत्येक विषयातील अनिवार्यता संपुष्टात आली. त्यामुळंच कॉलेजात शून्य मार्क्स मिळूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -