घरदेश-विदेशNEET MDS 2022 Postponed: नीट एमडीएस परीक्षा 2022 स्थगित, इंटर्नशिपची अंतिम मुदतही...

NEET MDS 2022 Postponed: नीट एमडीएस परीक्षा 2022 स्थगित, इंटर्नशिपची अंतिम मुदतही वाढवली

Subscribe

इंटर्नशिप पूर्ण करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्याच्या सूचना

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नोटीस जारी करत NEET MDS 2022 ची परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात आरोग्य मंत्रालयाने गुरुवार 17 फेब्रुवारी 2022 रोजी संबंधित संस्था आणि अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत.

याचसोबत इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम मुदतही वाढवण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाच्या काळात हजारो बीडीएस विद्यार्थ्यांना त्यांची इंटर्नशिप पूर्ण करता आली नाही. यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले होते. कारण परीक्षेला बसण्यासाठी इंटर्नशिप कालावधी पूर्ण करणे अनिवार्य आहे.

- Advertisement -

नीट पीजी 2022 सोबतच होणार नीट एमडीएसची परीक्षा

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपल्या स्थगिती स्वीकृती अधिसूचनेत म्हटले आहे की, सक्षम प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे की, NEET-MDS परीक्षा 2022 चे आयोजन 4-6 आठवड्यांनी पुढे ढकलले जाईल आणि शक्यतो त्याच तारखेच्या आसपास आयोजित केले जाईल. NEET-PG 2022 साठी शेड्यूल केले गेले आहे.

- Advertisement -

इंटर्नशिप पूर्ण करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्याच्या सूचना

यासोबतच इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यासही मान्यता देण्यात आली आहे. MDS उमेदवारांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 रोजी संपत आहे. तर भारतीय दंत परिषद (DCI) द्वारे औपचारिक घोषणा आणि सूचना जारी केल्या जातील. त्याच वेळी, डीसीआयने जारी केलेल्या सूचनांच्या आधारे राष्ट्रीय वैद्यकीय परीक्षा मंडळाकडून नवीन कार्यक्रम जाहीर केला जाईल.

NEET PG 2022 प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

त्याच वेळी NEET PG परीक्षांसंदर्भातील मुद्दाही सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उमेदवारांना केंद्र सरकारकडे जाऊन आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. यावेळी केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या समस्यांचा गांभीर्याने विचार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कारण आरोग्य मंत्रालयाने NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती तर इंटर्नशिपची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय देखील आरोग्य मंत्रालय आणि संबंधित परीक्षा नियामकालाच घ्यायचा आहे.


ठाणे खाडी क्षेत्राला मिळणार रामसर स्थळाचा दर्जा; राज्य सरकारने केंद्राला पाठवला प्रस्ताव

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -