Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश NEET PG 2022 Result : नीट पीजी 2022 चा निकाल जाहीर; केंद्रीय...

NEET PG 2022 Result : नीट पीजी 2022 चा निकाल जाहीर; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांसह NBEMS चं कौतुक

Subscribe

गेल्या वर्षी NEET-PG 2021 मध्ये एकूण 1 लाख 77 हजार 415 उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि सुमारे 93 टक्के उमेदवारांनी हजेरी लावली होती.

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने बुधवारी म्हणजे आज NEET PG 2022 चा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान  10 दिवसांच्या विक्रमी वेळेत NEET-PG 2022 चा निकाल जाहीर केल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनेशनचे (NBEMS) विशेष कौतुक केले आहे. मांडविया यांनी ट्विट करत NEET-PG साठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे देखील अभिनंदन केले आहे. दरम्यान नीट पीजी परीक्षेत बसलेले उमेदवार nbe.edu.in या अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन, तसेच एनबीईएमएसचे कौतूक

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत म्हटले की, “नीट-पीजीसाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. निर्धारित वेळेच्या विक्रमी 10 दिवस आधी निकाल जाहीर करण्याचे कौतुकास्पद काम केल्याबद्दल मी राष्ट्रीय परीक्षा मंडळाचे अर्थात एनबीईएमएसचे कौतुक करतो.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर NEET-PG 2022 परीक्षा 21 मे रोजी देशातील 267 शहरांमधील 849 केंद्रांवर घेण्यात आली. एकूण 2 लाख 06 हजार 301 उमेदवार परीक्षेला बसणार होते, मात्र 1 लाख 82 हजार 318 उमेदवारच बसले. परीक्षेत 200 बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. हे सर्व प्रश्न इंग्रजीत होते.

सर्वोच्च न्यायालयाने NEET PG पुढे ढकलण्यास दिला नकार

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने अलीकडेच NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला. वैद्यकीय उमेदवारांची याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, NEET PG पुढे ढकलल्याने अनिश्चितता निर्माण होईल आणि परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येवर याचा परिणाम होईल. तसेच तपासणीस उशीर झाल्यास डॉक्टरांची संख्या कमी होईल याचा रुग्णांच्या सेवेवर गंभीर परिणाम होईल.


Sidhu Moose Wala Murder : सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला लवकरच घेऊ; दिल्लीच्या ‘या’ गँगने दिले ओपन चॅलेंज

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -