घरताज्या घडामोडीNEET Result 2021: नीट यूजीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

NEET Result 2021: नीट यूजीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

Subscribe

राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेचा (NEET UG 2021) निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी एनटीएच्या अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.inवर जाऊन निकाल पाहू शकतात. नीट यूजी २०२१ची परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर विद्यार्थी देशातील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस कोर्ससाठी अॅडमिशन घेऊ शकतात.

विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे एनटीए ऑल इंडिया कोटा अंतर्गत १५ टक्के जागांसाठी एक गुणवत्ता यादी तयार करेल. यासोबत एनटीए राज्य कोट्यातील इतर ८५ टक्के जागांच्या काउंसलिंगसाठी सर्व राज्यातील पात्र विद्यार्थ्यांची यादी संबंधित विभागाला देईल. ज्याआधारावर राज्य आपली गुणवत्ता यादी तयार करेल.

- Advertisement -

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी नीटचा निकाल जाहीर होण्यास विलंब लागला आहे. गेल्या वर्षी नीटचा निकाल १८ ऑक्टोबरला घोषित झाला होता. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा पास करण्यासाठी किमान नीट २०२१ कट-ऑफ पर्सेंटाइल आणि स्कोअर मिळवणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी नीट कट ऑफ स्कोअर जनरल कॅटेगरीसाठी ७२०-१४७ होती, जे ५०व्या पर्सेंटाइलच्या बरोबरीचे होते. तर एससी/एसटी/ओबीसी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी नीट कट ऑफ स्कोअर १४६-११३ होता, जे ४० व्या पर्सेंटाइलच्या बरोबरीचे होते. दरम्यान निकालात कोणत्याही त्रुटी असतील तर विद्यार्थी ई-मेल आयडी [email protected] च्या माध्यमातून एनटीएसोबत संपर्क करू शकतात.

असा पाहा नीटचा निकाल

  • अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.inवर जा.
  • होमपेजवर दिसणार निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • मग तुमच्या लॉगिन क्रेडेंशियल्सवर नोंदवा आणि सब्मिट करा.
  • त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर येईल, तो डाऊनलोड करा.
  • निकालाची एक प्रिंट आऊट देखील काढा.
Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -