घरदेश-विदेशपर्यवेक्षकाच्या चुकीमुळे दोन उमेदवारांसाठी 'नीट' परीक्षा पुन्हा घ्या, हायकोर्टाचा आदेश

पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे दोन उमेदवारांसाठी ‘नीट’ परीक्षा पुन्हा घ्या, हायकोर्टाचा आदेश

Subscribe

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १२ सप्टेंबर २०२१ रोजी देशभरात नीट परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सोलापूरातील नीट परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाच्या गोंधळामुळे दोन उमेदवारांना परीक्षा योगप्रकारे देता आली नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे दोन उमेदवारांसाठी ‘नीट’ परीक्षा पुन्हा घ्या  असा आदेश  हायकोर्टाने दिला आहे.

न्यायालयाने सुनावणी अंती पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे उमेदवारांचे झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेत त्यांची नीट परीक्षा पुन्हा घेण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) दिले आहेत.

- Advertisement -

वैष्णवी भोपळे (१९) आणि अभिषेक कापसे (१९) अशी या उमेदवारांची नावं आहेत. या दोघांनी अॅड. पूजा थोरात यांच्यामार्फत रिट याचिका करून आपली कैफियत मांडली होती. या याचिकेवर अंतिम सुनावणीवेळी न्यायमूर्ती रमेश धनुका व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठाने दोन्ही उमेदवारांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला,
या दोन्ही उमेदवारांची ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेऊन दोन आठवड्यांत निकाल जाहीर करावा, असे खंडपीठाने आदेशात जाहीर केले आहे.

मात्र याचिकाकर्त्या उमेदवारांना परीक्षेस पुन्हा बसू देण्याचा निर्णय प्रशासनाला घेता येणार नाही अशी भूमिक एनटीएने घेतली होती. मात्र प्रशासनाच्या चुकीमुळे या उमेदवारांचे नुकसान होऊ नये, असे निरीक्षण नोंदवत हा आदेश इतरांसाठी पायंडा म्हणून गृहित धरला जाऊ नये असं स्पष्ट आदेश खंडपीठाने एनटीएला दिला आहे.

- Advertisement -

वैष्णवी आणि अभिषेक हे उमेदवार सोलापूरमधील कुंभारी गावातील श्री स्वामी नारायण गुरूकूल इंटरनॅशनल स्कूल या परीक्षा केंद्रावर १२ सप्टेंबरला नीट परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान नीट अंतर्गत संपूर्ण देशात एकच प्रश्नपत्रिका असते. मात्र परीक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रश्नांचा क्रमांक वेगळा असतो. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकाच संकेतांकाची व एकाच लिफाफ्यात ठेवली जाते. याविषयी दर्शनी पानावर स्पष्ट सूचना दिल्या जातात.

असे असतानाही सोलापूरमधील कुंभारी गावातील श्री स्वामी नारायण गुरूकूल इंटरनॅशनल स्कूल या परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षकाने एका वर्गात १२ विद्यार्थ्यांच्या दोन गटांपैकी एका गटाला प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका योग्य पद्धतीने दिले. मात्र, सहा विद्यार्थ्यांच्या अन्य गटाला देताना गोंधळ घातला.

यात वैष्णवी व अभिषेकला एकाच संकेतांकाची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका मिळाली नाही. मात्र पर्यवेक्षकाला ही चूक वारंवार दाखवून दिली असता त्याने दोघांनाही दरडावून गप्पा बसण्याचा सूचना केल्या. परीक्षा संपताच शाळेच्या मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी व संबंधितांनाही ईमेलद्वारे तक्रार केली. अखेर शाळेने आपल्या चुकीचे कबूली दिली आहे.


Coronavirus : कोरोना महमारीने भारतीयांचे आयुर्मान दोन वर्षांनी घटले, IIPS चा अहवाल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -