Friday, July 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी NEET UG 2021: नीट यूजीच्या परीक्षेचे आयोजन 'इतक्या' शहरांमध्ये; सेंटरवर परीक्षेपूर्वी मिळणार...

NEET UG 2021: नीट यूजीच्या परीक्षेचे आयोजन ‘इतक्या’ शहरांमध्ये; सेंटरवर परीक्षेपूर्वी मिळणार फेस मास्क

Related Story

- Advertisement -

मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट यूजी २०२१ (NEET UG 2021) परीक्षेची तारीख घोषित करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोविड प्रोटोकॉलबाबत माहिती दिली आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार नीट परीक्षेचे आयोजन आता १५५ च्या जागे ऐवजी १९८ शहरांमध्ये केले जाणार आहे. शिवाय परीक्षा केंद्राची संख्या वाढवणार देखील आहेत. २०२०मध्ये एकूण ३ हजार ८६२ परीक्षा केंद्रावर नीट यूजीच्या परीक्षेचे आयोजन केले होते. पण आता सोशल डिस्टन्सिंगमुळे परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे. तसेच कोरोना प्रोटोकॉलचे (नियम) पालन करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना फेस मास्क दिले जातील.

- Advertisement -

नवे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि नवे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडून नीट यूजी २०२१ परीक्षेबाबत मोठा निर्णय घेण्याची अपेक्षा केली जात होती. बऱ्याच काळापासून विद्यार्थी परीक्षा घेण्याची मागणी करत होते. याच अनुषंगाने नीट यूजी २०२१ची परीक्षा १२ सप्टेंबरला घेण्याचा निर्णय झाला. उद्यापासून परीक्षेचा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेच्या आयोजनाबाबत एनटीएची एक फेक नोटिस व्हायरल झाली होती. ज्यानंतर एनटीएने म्हणाले की, नीट यूजी २०२१ परीक्षेच्या आयोजन तारेखसंदर्भात सल्लामसलत केली जात असून लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाणार आहे.

कसा करायचा अर्ज?

नीट यूजी परीक्षेसाठी अर्जाकरता नॅशनल टेस्टिंग एजेंसी म्हणजेच एनटीएची वेबसाईट neet.nta.nic.in यावर जावे लागले. अर्ज पाच टप्प्यात भरायचा आहे. सर्वात पहिल्यांदा नीटसाठी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावी लागेल. त्यानंतर अर्ज भरायचा आहे. मग फोटो, स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करायचा आहे. नंतर परीक्षेची फी भरून शेवट कन्फर्मेशन पेजचे प्रिंट आउट घ्यायची आहे.


- Advertisement -

हेही वाचा – कोरोना लसीच्या डोसचे Mixing And Matching धोकादायक ठरू शकते – WHO


 

- Advertisement -