Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश NTA NEET 2021 : आता नीट परीक्षा तब्बल १३ भाषांमध्ये देता येणार;...

NTA NEET 2021 : आता नीट परीक्षा तब्बल १३ भाषांमध्ये देता येणार; तर कुवेतमध्ये सुरु झालेयं नवे परीक्षा केंद्र

Related Story

- Advertisement -

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी होणारी एनईईटी (NEET(UG) 2021 ही परीक्षा आता तब्बल १३ भाषांमध्ये देता येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी ट्ववीट करत यासंदर्भातील अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

तसेच पश्चिम आशियातील भारतीय विद्यार्थ्यांसाठी कुवेतमध्ये नवे नीट परीक्षा केंद्र सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.देशात NEET(UG) 2021 परीक्षा पहिल्यांदाच १३ भाषांमध्ये आयोजित केली जात आहे. ज्यामध्ये पंजाबी, मल्याळम अशा स्थानिक भाषांचीही जोड देण्यात आली आहे. त्यामुळे आता NEET(UG) परीक्षा विद्यार्थ्यांना हिंदी, मराठी, पंजाबी, आसामी, बंगाली, आडिशा, गुजराती, तेलगु, मल्याळम, कन्नड, तमिळ, उर्दू आणि इंग्रजी अशा तेरा भाषांमध्ये देता येणार आहे.

- Advertisement -

या वैद्यकीय प्रवेश परीक्षेची NEET(UG) 2021 ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया १३ जुलै २०२१ पासून सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरु झाली असून उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in आपला अर्ज दाखल करु शकतात. कोरोनाचे नियम पाळून १२ सप्टेंबर रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

- Advertisement -

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा एनईईटी पीजी( NEET PG) ११ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विट करत दिली. सोमवारी एनटीएने एनईईटी यूजी परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. मात्र परीक्षेदरम्यान, सर्व उमेदवारांना मास्क घालावे लागतील आणि बसण्याची योजना सोशल डिस्टन्स पाळून तयार केली जाईल.

केंद्रीय मंत्र्यांचे ट्वीट

केंद्रीय मंत्री मनसुख मंडावीया यांनी मंगळवारी संध्याकाळी ट्वीट केले की, आम्ही ११ सप्टेंबर २०२१ रोजी एनईईटी पदव्युत्तर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व तरुण वैद्यकीय इच्छुकांना माझ्या शुभेच्छा.

- Advertisement -