संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. एकाबाजूला कोरोनाच्या मृत्यूच्या संख्येत काही कमी होताना दिसत नाही तर दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या महामारीत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. अशी एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. एका तरुणीला आपल्या जन्मदात्यासाठी ऑक्सिजन सिलिंडरची गरज होती, तेव्हा तिच्या शेजाऱ्यांने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घटना समोर आली.
भावरीन कंधारी नावाच्या एका ट्वीटर युझरने ट्वीट करून याबाबत सांगितले. युझरने लिहिले की, ‘माझ्या एका मित्राच्या बहिणीला आपल्या वडिलांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची गरज होती. तिच्या शेजऱ्याने सिलिंडरच्या मोबदल्यात आपल्या सोबत झोपण्यास सांगितले. यावर काय कारवाई केली जाऊ शकते, कारण तो हे बोलल्याचे नाकारेल.’
My friend’s sister like my baby sister was asked by a neighbour in an elite colony to sleep with him for an oxygen cylinder that she desperately needed for her father;
What action can be taken because the b* will obviously deny, no?#HumanityIsDead
— Bhavreen Kandhari (@BhavreenMK) May 11, 2021
खरंतर भावरीन कंधारी या तरुणीने सोशल मीडियावर याबाबत शेअर करून घटनेला वाचा फोडली आहे. भावरीन कंधारीचे ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे. लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे. काहींनी मागणी केली की, त्या व्यक्तीचे नाव सांग, जेणेकरून त्याला लाज वाटली पाहिजे. तर काहींनी सांगितले की, त्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.
हेही वाचा – संतापजनक! सेकंड हँड गाडीसाठी आई-वडिलांनी विकले आपल्या नवजात बाळाला