घर ताज्या घडामोडी काठमांडूमध्ये 'टेक्स्ट बुक फ्री फ्रायडे' योजना यशस्वी, पुस्तके आणि दप्तरविना विद्यार्थी येणार...

काठमांडूमध्ये ‘टेक्स्ट बुक फ्री फ्रायडे’ योजना यशस्वी, पुस्तके आणि दप्तरविना विद्यार्थी येणार शाळेत

Subscribe

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये 'टेक्स्टबुक फ्री फ्रायडे'चा नवी योजना सुरू करण्यात आला आहे. शहरातील सर्व शाळांना ही योजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या शहरातील 89 पैकी 56 सामुदायिक शाळांमध्ये ही योजना सुरू झाली आहे.

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये ‘टेक्स्टबुक फ्री फ्रायडे’चा नवी योजना सुरू करण्यात आला आहे. शहरातील सर्व शाळांना ही योजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या शहरातील 89 पैकी 56 सामुदायिक शाळांमध्ये ही योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत शुक्रवारी मुलांना वह्या व दप्तरविना शाळेत येण्यास सांगितले जाणार आहे. त्या दिवशी शाळांमध्ये मूलभूत जीवनकौशल्ये शिकवली जातील आणि त्यांचा अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभाग घेतला जाईल.

शुक्रवारपासूनच ही योजना सुरू झाली. काही शिक्षक आणि पालक संघटनांनी या योजनेचे स्वागत केले आहे. मात्र संपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण न करता ही योजना राबविली जात असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ती प्रचाराची नौटंकी म्हणून राहण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी नगर प्रशासनाने दोन कोटी नेपाळी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. शहर प्रशासनाच्या शिक्षण विभागाचे प्रमुख सीताराम कोईराला यांनी ही माहिती दिली आहे. (NEPAL Children Will Come To School Without Books And Bags On Friday)

- Advertisement -

या योजनेअंतर्गत इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 10 विषयांवर शॉर्ट टर्म कोर्स करण्याची संधी दिली जाणार आहे. या विषयांमध्ये शेती, फलोत्पादन, सौंदर्यप्रसाधन प्रशिक्षण, सुतारकाम, कोरीव काम, पाककला, फॅशन डिझाईन, कपडे शिवणे, इलेक्ट्रिक वायरिंग, आपत्ती सज्जता, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्ती, प्लंबिंग आणि शिल्पकला यांचा समावेश आहे.

‘यापैकी प्रत्येक अभ्यासक्रम ऐच्छिक आहे. प्रत्येक अभ्यासक्रमाचा कालावधी ९० दिवसांचा असेल. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ९० कंपन्यांनी अर्ज केले आहेत. प्रशासन योग्य कंपन्या निवडण्याच्या कामात गुंतले आहे’, असे कोईराला म्हणाले.

- Advertisement -

‘प्रशिक्षणासाठी कामांची निवड करताना, अशा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना घरगुती गरजा पूर्ण करता याव्यात हे ध्यानात ठेवण्यात आले आहे. प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धतीत अशा कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात होते. पण आम्ही पाश्चात्य शिक्षण स्वीकारले आणि त्यामुळेच आम्ही कुठेही पोहोचलो नाही’, असे काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी सांगितले.

इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे अतिरिक्त अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना आहे. मानसिक आणि शारीरिक विकास हा त्यामागचा हेतू असेल. या विद्यार्थ्यांना लेखन, संगीत, कविता लेखन आदी उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाईल. याशिवाय त्यांना शेततळे खोदणे, झाडे लावणे, खड्डे काढणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आदी कामांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मात्र शहर प्रशासनाच्या या योजनेवर काही शिक्षणतज्ज्ञांनी ते खूश नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते, शाळांच्या पायाभूत सुविधा जोपर्यंत त्यासाठी तयार होत नाहीत, तोपर्यंत अशी योजना राबवता येणार नाही.


हेही वाचा  ‘भावनेच्या भरात ते बोलले’, सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राधाकृष्ण विखे-पाटलांची प्रतिक्रिया

- Advertisment -