घरक्राइमनेपाळ क्रिकेट संघाच्या कर्णधारावर बलात्काराचा आरोप; अटक वॉरंट जारी

नेपाळ क्रिकेट संघाच्या कर्णधारावर बलात्काराचा आरोप; अटक वॉरंट जारी

Subscribe

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका क्रिकेटपटूविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. संदीप लामिछान असे या खेळाडूचे नाव आहे. संदीप हा नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका क्रिकेटपटूविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. संदीप लामिछान असे या खेळाडूचे नाव आहे. संदीप हा नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता संदीप लामिछान हा फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शिवाय, त्याचे लोकेशन तपासले असता, तेही अद्याप समजलेले नाही. (Nepal Cricketer Sandeep Lamichhane Accused Of Raping Minor Absconding Police Looking)

संदीप लामिछान याच्यावरील अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा आरोपामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाची शरमेने मान खाली गेल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणाबाबत समजताच संदीपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये स्वत:ला निर्दोष असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

नेपाळ पोलिसांनी या प्रकरणी संदीपला अटक करण्याच्या दृष्टीने इंटरपोलची मदत घेतली आहे. इंटरपोलने संदीपच्या विरोधात डिफ्यूजन नोटीस बजावली आहे. याशिवाय, संदीप देशात परतला नाही. तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आणि त्याचे लोकेशन देखील अद्याप कळालेले नाही.

संदीप लामिछानवरील बलात्काराच्या आरोपाची माहिती मिळताच नेपाळ क्रिकेट संघाने 8 सप्टेंबर रोजी एक आदेश देत त्याला निलंबित केले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटर संदीपवर काठमांडू येथील एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. शिवाय, ही घटना एका हॉटेलमध्ये झाल्याचे समजते. या प्रकरणी न्यायलयाने संदीपविरोधात अटक वॉरंट देखील जारी केले होते. पण संदीप अद्याप देशात परतलेला नाही. संदीप वेस्ट इंडिज येथील कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळत होता. तेथून तो रवाना देखील झाला, पण सध्या तो कुठे आहे हे अद्याप कळालेले नाही.


हेही वाचा – IND vs SA : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी संजू सॅमसन भारतीय संघाचा उपकर्णधार?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -