नवी दिल्ली : नेपाळमध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात एका मोठी विमान दुर्घटना घडली होती. यामध्ये तब्बल 18 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. अशामध्ये सोमवारी (6 जानेवारी) पुन्हा एकदा एक मोठी विमान दुर्घटना टळली आहे. नेपाळच्या काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाने आपत्कालीन लँडिंग केले. विमानाच्या डाव्या इंजिनला आग लागल्याचे समजताच पायलटने लँड करण्याचा निर्णय घेतला. (Nepal Kathmandu Plane Emergency landing due to catch fire)
हेही वाचा : Indian Railway : लेकीसाठी आईने थांबवल्या दोन सुपरफास्ट एक्स्प्रेस, दिल्लीत नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या बुद्ध एअरलाइन्सच्या विमानाच्या डाव्या इंजिनला आग लागली. यानंतर काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानामध्ये क्रू मेंबर्ससह 76 प्रवासी होते. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाने या आपत्कालीन लँडिंगबाबत माहिती देणारे निवेदन जारी केले. यामध्ये म्हटले की, विमानाने VOR लँडिंग केल्यानंतर ते सुरक्षितपणे विमानतळावर पोहोचले. यामध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, VOR लँडिंग म्हणजे वैमानिकांसाठी ग्राउंड-आधारित रेडिओ स्टेशनवरून सिग्नल वापरून नेव्हिगेट करण्याचा आणि विमान उतरवण्याचा एक मार्ग आहे.
VOR म्हणजे अति उच्च वारंवारता सर्व दिशात्मक श्रेणी (Very High Frequency Omnidirectional Range). यामध्ये आपत्कालीन लँडिंग या पद्धतीमुळे पायलटला अंधार, धुके किंवा पावसामुळे धावपट्टी स्पष्टपणे दिसू शकत नाही, तेव्हा विमानाला धावपट्टीशी संरेखित करण्यास मदत होते. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रगडीसाठी BHA 953 या विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.37 वाजता उड्डाण केले. त्यानंतर काही वेळातच डाव्या इंजिनला आग लागली. त्याचे VOR लँडिंग त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 11.15 वाजता करण्यात आले. विमानातील सर्व ७२ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स पूर्णपणे सुरक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
काठमाडौंबाट भद्रपुर उडान नं. 953, जहाज कल साईन 9N-AJS, मा दायाँ इञ्जिनमा प्राविधिक समस्या देखिएको हुँदा जहाजलाई पुनः काठमाडौं डाईभर्ट गरि 11:15 मा त्रिभुवन विमानस्थलमा सुरक्षित अवतरण गराईएको छ । जहाजलाई हाम्रा टेक्निकल टिमले चेकजाँच गरिरहेका छन् ।
यात्रुहरुलाई अर्को जहाजबाट…— Buddha Air (@AirBuddha) January 6, 2025
या अपघाताबाबत बुद्ध एअरलाइन्सने ट्विटरवर सांगितले की, “काठमांडूमधून भद्रपूरला जाणारे फ्लाइट 953 त्याच्या उजव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे काठमांडूला परत वळवण्यात आले. सकाळी 11.15 वाजता विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. आमचे तांत्रिक पथक सध्या विमानाची तपासणी करत असून प्रवाशांना भद्रपूरला पाठवण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.” अशी माहिती दिली.