घरदेश-विदेशनेपाळ विमान अपघातामागील कारण लवकरच येणार समोर; अखेर ब्लॅक बॉक्स सापडला

नेपाळ विमान अपघातामागील कारण लवकरच येणार समोर; अखेर ब्लॅक बॉक्स सापडला

Subscribe

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळालगत झालेल्या विमान अपघातात आतापर्यंत 68 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या विमानात केबिन क्रू आणि प्रवासी मिळून एकूण 72 प्रवासी प्रवास करत होते. यात पाच भारतीय नागरिकांचा ही समावेश होता. अद्याप विमान अपघातग्रस्त ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. तपासकर्त्यांकडून विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर 16 जानेवारी सकाळी हा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. विमानाच्या मागच्या भागात असलेल्या ब्लॅक बॉक्समधून आता अपघाताचं मुख्य कारण काय होतं ते समोर येणार आहे.

विमानातील या ब्लॅक बॉक्समधून विमान अपघातामागील तांत्रिक कारणाचा शोध घेतला जाणार आहे. यति एअरलाइन्स 9N-ANC ATR-72 या विमानाने रविवारी सकाळी 10.33 वाजता काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले, मात्र लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वीचं विमान सेती नदीच्या किनारी कोसळले.

- Advertisement -

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

विमान अपघातामागचे कारण शोधण्यासाठी दोन उपकरणं अतिशय महत्वाचे असतात. यात डिजीटल फ्लाईट डेटा रिकॉर्डर (DFDR) आणि वैमानिकांचा आवज रेकॉर्ड करणारं कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर या उपकरणांना सामान्य भाषेत ब्लॅक बॉक्स म्हणतात, यात विमान उड्डाणापासून ते लँडिंगपर्यंत संपूर्ण प्रवासाची तांत्रिक माहिती, वैमानिकांमधील संभाषण आणि फ्लाईट डेटा स्टोर केला जातो.

एखादं विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यास ब्लॅक बॉक्सच्या मदतीने तपास अधिकारी विमानाचा प्रवास आणि अपघातासाठी काय गोष्टी जबाबदार ठरल्या? यावेळी नेमकं काय घडलं ? अशी महत्वपूर्ण माहिती मिळतात.

- Advertisement -

यातील कॉकपिटमध्ये विमानातील वैमानिकांमधील संभाषण रेकॉर्ड होते, तर फ्लाईट डेटा रिकॉर्डरमध्ये विमानाची गती आणि उंची रेकॉर्ड होते. ज्याचा रंग ऑरेंज असून ते कोणत्याही परिस्थितीत खराब होत नाही. हे उपकरण सुमारे 20,000 फूट उंचावरूनही शोधले जाऊ शकते. याचा बॅटरी बॅकअप 30 दिवसांपर्यंत चालतो, परंतु यातील स्टोर डेटा वर्षानंतरही वापरता येतो.

नेपाळमध्ये 15 जानेवारी रोजी लँडिंगच्या अवघ्या काही वेळापूर्वी ATR-72 या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानात 5 भारतीयांसह एकूण 72 प्रवासी होते. आत्तापर्यंत या अपघातात 68 जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 जणांचा शोध अद्याप सुरु आहे. नेपाळच्या अधिकाऱ्यांनी एका विशेष आयोगाकडे अपघाताच्या कारणाचा तपास घेण्याचं काम सोपावलं आहे. 45 दिवसांत या घटनेचा अहवाल येणं अपेक्षित आहे. दुसरीकडे विमान अपघाताबाबत नेपाळमध्ये आज राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.


मुंबईचा जोशीमठ झाला तर जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंकडून प्रश्नांचा भडिमार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -