घरदेश-विदेशनेपाळ मधील शिळेतून साकारणार प्रभू रामाची मूर्ती

नेपाळ मधील शिळेतून साकारणार प्रभू रामाची मूर्ती

Subscribe

श्री राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, शाळिग्राम नदीतून शिळा काढताना विधी करण्यात आली. विशेष पुजाही करण्यात आली. शिळांवर गलेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला. नदीची क्षमा मागण्यात आली. शाळिग्राम नदीतील शिळा काढण्याासाठी नेपाळ सरकारची परवानगी घेण्यात आली.

अयोध्याः अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिरात प्रभू रामाची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळ येथून दोन शिळाग्राम शिळा आणल्या जात आहेत. प्रभू राम व सीतेची मूर्ती या शिळातूनच घडवली जाणार आहे. या मुर्तींची स्थापना मंदिरातील गर्भगृहात किंवा मंदिरात इतर कोणत्या ठिकाणी करणार याचा निर्णय अद्याप मंदिर ट्रस्टने घेतलेला नाही.

नेपाळमधील पोखरा येथील शाळिग्राम नदीतून या दोन शिळा काढण्यात आल्या आहेत. भूगर्भ व पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार या शिळा नदीतून काढण्यात आल्या आहेत. या शिळा प्राचिन काळातील आहेत. या शिळा शाळिग्राम नदीतच मिळतात. या नदीचा प्रवास भारतात सुरु झाल्यानंतर ती नारायणी नदी नावाने ओळखली जाते. सरकारी कागदोपत्री तिचे नाव बुढी गंडकी नदी असे आहे. पुढे ही नदी भारतातील दामोदर कुंड येथून बिहारच्या सोनपूर येथील गंगा नदीला मिळते. या नदीतील दगड प्रभू रामाच्या नावाने पुजले जातात.

- Advertisement -

श्री राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, शाळिग्राम नदीतून शिळा काढताना विधी करण्यात आला. विशेष पुजाही करण्यात आली. शिळांवर गलेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला. नदीची क्षमा मागण्यात आली. शाळिग्राम नदीतील शिळा काढण्याासाठी नेपाळ सरकारची परवानगी घेण्यात आली.

१ जानेवारी २०२४ पर्यंत राम मंदिर तयार होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच जाहीर केले. राम मंदिर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. राम मंदिराबाबतची कायदेशीर लढाई १३५ वर्षांपेक्षा जास्त वेळ चालली. १५ व्या शतकापासून सुरू असलेल्या लढाईला २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पूर्णविराम दिला. सर्वोच्च न्यायालयाने या विवादीत जमीनीवर राम मंदिराच्या उभारण्याची परवानगी दिली. तसेच, मुस्लिम समाजाला दुसरी जागा देण्याचे ठरवण्यात आले, असेही शाह यांनी सांगितले.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एक ट्रस्ट बनवून भव्य राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात केली गेली. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या राम मंदिराचे भूमी पूजन झाले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -