घरदेश-विदेशमासे विकून उदरनिर्वाह करते, म्हणून लोकांनी तिला केले ट्रोल

मासे विकून उदरनिर्वाह करते, म्हणून लोकांनी तिला केले ट्रोल

Subscribe

केरळमधील एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी तिचे घर चालवण्यासाठी महाविद्यालयातून सुटल्यानंतर मासे विक्री करते. संघर्षमय परिस्थितीवर मात करणाऱ्या या विद्यार्थिनीवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. परंतु काही लोकांनी तिचे कौतुक करण्याऐवजी तिला ट्रोल केले आहे.

घरची आर्थिक परिस्थीती बरी नसेल तर, अनेक विद्यार्थी काहितरी काम करुन आई वडिलांना घर सांभाळण्यात मदत करतात. याची अनेक उदाहरणे याआधी जगासमोर आली आहेत. असेच एक उदारण केरळमधील एका प्रमुख वृत्तपत्राने समोर आणले. केरळमधील एक महाविद्यालयीन विद्यार्थीनी महाविद्यालयाच्या वेळेनंतर मासे विकते. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ती तिचा उदरनिर्वाह करते. या मुलीबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेकांनी तिचे कौतूकदेखील केले. परंतु काही लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. तिला ट्रोल करणाऱ्यांनी तिच्या कथेला फेक (खोटी) म्हणत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हनन हमीद असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती थोडुपुझा येथील एका खासगी महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत आहे. तिला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री अल्फॉन्स कन्नंथनम यांनी चांगलेच सुनावले आहे.

प्राचार्य आणि मित्र आले धावून

हनन हमीद हिची कथा प्रकाशित झाल्यानंतर ती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली. काही चित्रपट कलाकार व राजकीय नेत्यांनीही तीची कथा सोशल मीडियावर शेअर केली. परंतु, काहींनी तिची कथा खोटी असल्याचे म्हणत तिला ट्रोल केले आहे. यानंतर, हननच्या कॉलेजचे प्राचार्य तसेच तिचे शेजारी व मित्र तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी ही कथा सत्य असल्याचे सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisement -

केंद्रीय मंत्री कन्नंथनमल यांनी लिहिली फेसबुक पोस्ट

केंद्रीय मंत्री कन्नंथनमल यांनी याबाबात फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, हननवर टीका करणे थांबवा. एक मुलगी आपले विखुरलेले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्यावर टिका करणाऱ्यांनो मला तुमची लाज वाटते. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरणदेखील दिले आहे. मोदींची घरची परिस्थितीदेखील हालाकीची होती. अशा परिस्थितीवर मात करत आज ते पंतप्रधान झाले आहेत.

 

दरम्यान हनन हिने लोकांना, तिच्यावर टिका करणाऱ्यांना आणि तिचे कौतुक करणाऱ्यांनादेखील अशी विनंती केली आहे की, माझ्या उदरनिर्वाहासाठी मला हवे ते काम करू द्या

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -