घरदेश-विदेशअसं वादळ आलं की अख्ख्या शहराचं झालं होत्याचं नव्हतं.... 23 जणांचा मृत्यू

असं वादळ आलं की अख्ख्या शहराचं झालं होत्याचं नव्हतं…. 23 जणांचा मृत्यू

Subscribe

या चक्रीवादळातल्या बळींची संख्या २३ वर आली आहे. मृतांचा हा आकडा आणखी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Mississippi Storms and Tornado: अमेरिकेतल्या मिसिसिपीमध्ये शुक्रवारी रात्री आलेल्या तीव्र चक्रीवादळामुळे शहरे अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लोकांच्या घर आणि कार्यालयातील वीज गुल झाल्यामुळे इथले जनजीवन उद्‌ध्वस्त झाले आहे. या चक्रीवादळातल्या बळींची संख्या २३ वर आली आहे. मृतांचा हा आकडा आणखी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

वादळाचा तडाखा बसलेल्या भागात मुसळधार पाऊस आणि भल्या मोठ्या गाराही पडल्या आहेत. वादळामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून काही ठिकाणी लोक अडकल्याची भीतीत व्यक्त केली जात आहे. पावसामुळे काही भागातली वीजही गेली आहे. राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने सांगितले की, चक्रीवादळामुळे १६० किमी पेक्षा जास्त कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. नुकसान झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती आहे. चक्रीवादळ अनेक ग्रामीण शहरांना धडकले, यात अनेक झाडे आणि वीजांच्या तारा कोसळून पडल्या. त्यामुळे हजारो लोकांच्या घरी वीज नाही.

- Advertisement -

मिसिसिपी आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीने ट्वीट शेअर करत माहिती दिली आहे. पश्चिम मिसिसिपीमधील २०० लोकांचे शहर असलेल्या सिल्व्हर सिटीला चक्रीवादळाने उध्वस्त केलं आहे. यात बचाव दलाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत असून चार लोक बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे. अत्यंत उच्च क्षमतेच्या चक्रीवादळामुळे ३०,००० फुटांवर ढिगारा साचला गेला आहे, असं ओक्लाहोमा विद्यापीठातील स्कूल ऑफ मेटिऑरॉलॉजीचे सॅम इमर्सन यांनी सांगितलं.

मृतांच्या संख्येचा संदर्भ देताना एजन्सी म्हणाली, “दुर्दैवाने ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.” सीएनएनने नोंदवलेल्या माहितीनुसार शोध आणि बचाव पथके हे १,७०० लोकांचे शहर असलेल्या रोलिंग फोर्क शहराच्या बाहेर आहेत.
वादळाचा तडाखा बसलेल्या भागात अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. बेपत्ता लोकांच्या शोधासाठी प्रशासकीय पथके कार्यरत आहेत. या वादळाने २०११ मध्ये आलेल्या वादळाची आठवण जागी झाली. तेव्हा वादळामुळे १६१ जणांचा मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -