देशभरात 20 हजार139 नवे कोरोना रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 20 हजार 139 नवीन रुग्ण आढळले असून, 16 हजार 482 लोक कोरोनामुक्त झाले झाले आहेत.

coronavirus 3

मुंबईसह देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 20 हजार 139 नवीन रुग्ण आढळले असून, 16 हजार 482 लोक कोरोनामुक्त (Covid 19) झाले झाले आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याशिवाय, कोरोनामुळे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. (new 20139 corona patients in india)

देशभरात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 36 हजार 076 आहे. त्यामुळे सकारात्मकतेचा दर 5.10 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 25 हजार 557 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 1 लाख 36 हजार 076 आहेत. बुधवारच्या तुलनेत आज देशात कोरोनाचे 3 हजार 619 नवीन रुग्ण आढळले आहेत.

केंद्र सरकारने 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांसाठी कोरोनाचा बूस्टर डोस (corona vaccine booster dose) मोफत केला आहे. 15 जुलैपासून सर्व सरकारी केंद्रांवर कोरोनाचा बूस्टर डोस दिला जाणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या बुस्टर डोससंबंधीचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. त्यानुसार, येत्या 15 जुलैपासून ७५75 दिवस कोरोना लसीकरणाची (Corona Vaccination) मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस (Free Booster Dose) दिला जाणार आहे. ज्यांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांच्यासाठी बूस्टर डोस मोफत देण्याची व्यवस्था केंद्र सरकारतर्फे केली जाणार आहे.


हेही वाचा – १५ जुलैपासून १८ वर्षांपुढील नागरिकांना बुस्टर डोस मोफत