Corona Update: देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ, तर ३८४७ जणांचा मृत्यू

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे.

India Corona Update:
India Corona Update:

देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कमी झालेली रुग्णसंख्य़ा काही अंशी पुन्हा वाढली आहे. आदल्या दिवशीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज ३ हजारांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ११ हजार २९८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ८४७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येत मृतांचा आकडा काही अंशी घटत झाल्याने दिलासा मिळत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत २ लाख ११ हजार २९८ नवे कोरोना रूग्ण आढळले असून एका दिवसात ३ हजार ८४७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ लाख ८३ हजार १३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ७३ लाख ६९ हजार ९३ झाला आहे. देशात २ कोटी ४६ लाख ३३ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३ लाख १५ हजार २३५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या २४ लाख १९ हजार ९०७ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यासह आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २० कोटी २६ लाख ९५ हजार ८७४ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, २६ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३३ कोटी ६९ लाख ६९ हजार ३५३ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील २१ लाख ५७ हजार ८५७ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.


corona vaccine : १२ वर्षांवरील सर्वांसाठी Pfizer ची लस प्रभावी, कंपनीचा दावा