चिंताजनक! ‘या’ देशात वाढतोय मंकीपॉक्सचा प्रसार

मागील दोन वर्षांहून सुरू असलेल्या कोरोना महामारीचा (Monkeypox) प्रभाव अद्यापही दिसून येत आहे. जगभरातील काही देशांमध्ये अजूनही लॉकडाऊन (Lockdown) आहे तर, काही देशांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. एकीकडे कोरोना (Coronavirus) आणि दुसरीकडे दिवसेंदिवस नवे आजार उद्भवत आहेत.

Health monkeypox risk increased worldwide; WHO has suggested five measures

मागील दोन वर्षांहून सुरू असलेल्या कोरोना महामारीचा (corona) प्रभाव अद्यापही दिसून येत आहे. जगभरातील काही देशांमध्ये अजूनही लॉकडाऊन (Lockdown) आहे तर, काही देशांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. एकीकडे कोरोना (Coronavirus) आणि दुसरीकडे दिवसेंदिवस नवे आजार उद्भवत आहेत. काही दिवसांपूर्वीच कोरोना आणि त्यांच्या उपप्रकारानंतर ‘मंकीपॉक्स’ या नव्या आजाराने डोके वर काढले. सोमवारी ब्रिटनमध्ये (Britain) मंकीपॉक्सची (Monkeypox) आणखी ७७ प्रकरणे आढळून आली. त्यामुळे देशातील एकूण संक्रमित लोकांची संख्या ३०० हून अधिक झाली आहे. (new 77 cases of monkeypox in britain stirred up largest spread of infection)

जगभरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ब्रिटेनमध्ये आफ्रिकेबाहेर (Africa) मंकीपॉक्स संसर्गाचा हा सर्वात मोठा प्रसार असल्याचे सांगितले जात आहे. दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या मंकीपॉक्सच्या रुग्णांमुळे जगभरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, २४ पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्सचे ७८० नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

हेही वाचा – मंकीपॉक्सबाबत WHO कडून युटर्न; जगभर चिंता वाढली

या आजाराने आफ्रिका वगळता बाहेर कोणाचाही मृत्यू न झाल्याची माहिती मिळते. आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी कॅमेरून, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, काँगो आणि नायजेरियामध्ये मंकीपॉक्सची १ हजार ४०० हून अधिक प्रकरणे आढळली असून ६३ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, ब्रिटनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने या आजाराबाबत दिलेल्या माहितीनुसार, समलिंगी आणि बायसेक्सुअल लोकांना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तसेच, २० ते ४९ वयोगटातील आहेत.

हेही वाचा – कोरोना, मंकीपॉक्स, टोमॅटो फ्लू, मर्सपासून ते Norovirus पर्यंत; जगभरात ‘या’ 8 व्हायरसचा कहर

मंकीपॉक्सची लक्षणे काय?

ताप, पुरळ आणि गाठी येणे हे मंकीपॉक्सची सुरुवातीची लक्षणे (symptoms for Monkeypox)आहेत. यामध्ये कदाचित वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकतो. ही लक्षणे दोन ते चार आठवड्यांपर्यंत दिसतात, त्यानंतर निघून जातात. कधीकधी ही लक्षणे गंभीरही असू शकतात.

मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार आहे. संक्रमित व्यक्ती किंवा प्राणी यांच्याशी संपर्क आल्यास हा आजार पसरतो. तसेच, प्राण्यांच्या दूषित सामग्रीद्वारे मानवामध्ये हा आजार पसरतो. उंदीर आणि खारूताईमध्ये हा आजार सर्वाधिक आढळतो.


हेही वाचा – आरबीआयकडून नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी नवे नियम जारी, जाणून घ्या…