घरताज्या घडामोडीATM मधून पैसे काढण्याचे नियम १ जुलैपासून बदलणार

ATM मधून पैसे काढण्याचे नियम १ जुलैपासून बदलणार

Subscribe

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ATMचे काही नियम एप्रिल, मे, जून हे तीन महिने शिथील करण्यात आले होते. दरम्यान आता डेबिट कार्डचा वापर करून ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता १ जुलै पासून ATMचे नियम बदलणार नियम बदलणार असून यामुळे ATMमधून पैसे काढणं महाग होण्याची शक्यता आहे. तसेच इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढण्याचे चार्जेस देखील घेतले जाऊ शकतात.

कोरोनाच्या काळात अर्थमंत्रालयाने ATM मधून पैसे काढण्याच्या शुल्कात सूट दिली होती. यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला होता. ही सूट एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांसाठी होती. त्यामुळे ३० जूनला ही सूट संपत आहे. म्हणून १ जुलैपासून पूर्वीचे ATM मधूनच पैसे नियम लागू होणार आहेत.

- Advertisement -

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, महिन्याभरात आठवेळा पैस काढण्याची स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रमुख शहरांमध्ये मुभा दिली असून त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी शुल्क आकारले जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने मोफत दिलेल्या आठ व्यवहारपैकी ५ वेळा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM मधूनच पैसे काढू शकता आणि उर्वरित तीन वेळी तुम्ही इतर बँकच्या ATM मधूनच पैसे शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाने महानगर नसलेल्या शहरांमध्ये याचे प्रमाण १० व्यवहार असे ठेवले आहेत. यामध्ये तुम्ही ५ वेळा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM मधूनच पैसे काढून शकता तर उर्वरित ५ वेळा इतर बँकाच्या ATM मधूनच पैसे पैसे काढू शकता. यानंतरच्या व्यवहारासाठी २८ रुपये शुल्क लागण्याची शक्यता आहे. याप्रमाणे इतर बँका देखील नियमांमध्ये बदल करू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -