Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE जागतिक कोरोना अपडेट कोरोनाच्या नवा विषाणूवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं - WHO

कोरोनाच्या नवा विषाणूवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं – WHO

Related Story

- Advertisement -

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. अनेक देशांनी ब्रिटनसोबतचे दळणवळणाचे संबंध तोडले. ब्रिटनमध्ये सापडलेला नवा विषाणू वेगाने पसरत असल्याने सर्वांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान, आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) महत्त्वाचे विधान केले आहे. कोरोनाचा नवा विषाणू नियंत्रणाबाहेर नाही आहे, असे WHO ने म्हटले आहे. आपण सध्या घेत असलेल्या उपाययोजना योग्य आहेत, असे WHO ने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे कोरोना महामारीचे प्रमुख मायकल रायन यांनी सांगितले की, नवीन विषाणूचा प्रसार वेगाने होत असला, तरी याला रोखता येऊ शकते. हा विषाणू नियंत्रणाच्या बाहेर नाही आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपण आत्तापर्यंत जे करत आलो आहोत ते करण्याची गरज आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणतात की काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन विषाणू यापूर्वी अस्तित्वात आहे. माध्यमांशी बोलताना स्वामीनाथन म्हणाल्या की मला खात्री आहे की कोरोना विषाणूशी संबंधित त्यांच्या डेटाचे मूल्यांकन केल्यास काही इतर देशांमध्येही कोरोना विषाणूचा नवीन प्रकार सापडू शकेल. जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी रायन म्हणाले, “आम्ही सध्या घेत असलेल्या उपाययोजना योग्य आहेत.” यापूर्वी, यूकेचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी असा दावा केला होता की विषाणूचे नवीन रूप नियंत्रणात नाही. ब्रिटीश अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या मुख्य विषाणूच्या तुलनेत नवा प्रकार ७० टक्क्यांनी वेगाने पसरतो.

 

- Advertisement -