कोरोनाचा धोका वाढला! कुत्र्यांमधून होतोय कोरोनाचा प्रसार, धक्कादायक माहिती आली समोर

कुत्र्यांमधून होतो कोरोनाचा प्रसार.

New coronavirus found, and it jumped from dogs to people
कोरोनाचा धोका वाढला! कुत्र्यांमधून होतोय कोरोनाचा प्रसार, धक्कादायक माहिती आली समोर

वाढत्या कोरोना विषाणूचा प्रसार हा चीनच्या वुहानमधून होत असल्याची सर्वप्रथम माहिती समोर आली. पण, नेमका कोरोना विषाणूचा प्रसार कुठून होत आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. हा कोरोनाचा विषाणू प्राण्यांपासून माणसांपर्यंत पोहोचत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु, याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. मात्र, आता जी माहिती समोर आली आहे ती अधिकच चिंता वाढवणारी आहे. कारण कोरोना विषाणू कुत्र्यांकडून माणसांकडे येत असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. मात्र, अद्याप याबाबत संशोधन पूर्ण व्हायचे आहे. परंतु, संशोधनातून यावर शिक्कामोर्बत झाल्यास प्राण्यांकडून माणसांपर्यंत येणारा हा आठवा विषाणू ठरेल.

प्राण्यांकडून माणसांपर्यंत पोहोचवणारा ८ विषाणू

कुत्रा हा प्राणी कोरोना विषाणूचा प्रसार माणसांपर्यंत पोहोचवत असेल तर संशोधनातून याबद्दल शिक्कामोर्तब झाल्यास हा आठवा विषाणू ठरणार आहे. कारण यापूर्वी प्राण्यांकडून माणसांपर्यंत पोहोचवणारे सात प्रकारचे कोरोना विषाणू आढळून आले आहेत. यामधील चार विषाणूंममुळे साधारण सर्दी होत असल्याचे समोर आले आहे. तर इतर तीन विषाणूंमुळे एसएआरएस (SARS), एमइआरएस (MERS) आणि कोरोना (COVID -19) होत असल्याचे समोर आले आहे.

‘क्लिनिकल इन्फेक्शियस डिजीज’ नावाच्या जर्नलने नुकतेच एक संशोधन केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘मलेशियातील एका राज्यात रुग्णालयात दाखल असलेल्या ३०१ न्युमोनिया रुग्णांचे नेझल स्वॅब घेण्यात आले. त्यानंतर त्याची चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर यातील ८ नमुने कॅनाइन कोरोना विषाणूसाठी पॉझिटिव्ह होते. तर कॅनाइन कोरोना विषाणू कुत्र्यांमध्ये आढळून येत असल्याचे समोर आले आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आलेले बहुतांश नमुने पाच वर्षांखालील मुलांचे आहेत’, अशी माहिती संशोधन अहवालातून समोर आली आहे.

यामुळे कुत्र्यांमध्ये विषाणू पसरतो

रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांचे जीनोम सीक्वेसिंग करण्यात आले. त्यातून CCoV-HuPn-2018 नावाचा एक स्ट्रेन आढळून आला आहे. हा आढळून आलेला स्ट्रेन बऱ्याच अंशी कोरोना विषाणूसारखा आहे. यामुळे मांजरी, कुत्रे आणि डुकरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरतो. या संशोधनातून समोर आलेल्या नव्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा – आंध्र प्रदेशमध्ये कोरोना झटपट बरा करणार्‍या औषधासाठी लोकांची उडाली झुंबड!