New Corona Virus In China मुंबई : वर्ष 2019 मध्ये चीनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसने वर्ष 2020 मध्ये संपूर्ण जगभराता हाहाकार माजवला होता. चीनसह जगभरातील नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यानं क्वारंटाइन व्हावं लागत होतं. मात्र, दिवसाला रुग्णांची संख्या हजारोंनी वाढत असल्याने रुग्णालयातही जागा शिल्लक नव्हती. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. भारतातही या कोरोना व्हायरसमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, आरोग्य विभागाकडून निर्माण करण्यात आलेल्या कोरोना लसीमुळे या व्हायरसवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं. परंतु, असाच कोरोना व्हायरस पुन्हा एकदा चीनमध्ये आढळला आहे. विशेष म्हणजे हा व्हायरस जनावरांच्या संसर्गातून होत असल्याची माहिती समोर येत आहे. (new covid 19 infection from animals to humans new corona virus found in china news in marathi)
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील एका टीमला नवा कोरोना व्हायरस सापडला आहे. हा नवा व्हायरसचा प्राण्यांमधून माणसांना संसर्ग होण्याचा धोका आहे. कोरोना कोठून आणि कसा आला याबाबत अद्याप ठोस माहिती नसली तरी, काही अभ्यासकांनी हा व्हायरस वटवाघळांमधून आला असल्याचे सांगितले होते. हा व्हायरस Covid 19 प्रमाणेच मानवी रिसेप्टरचा वापर करतो. याबाबतचा अभ्यास आणि संशोधन शी झेंगली यांनी केलं आहे. शी झेंगली यांना कोरोना व्हायरसवरील त्यांच्या संशोधनामुळे ‘बॅटवुमन’ म्हणून देखील ओळखलं जातं.
शी झेंगली या वुहान विद्यापीठ आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह ते काम करतात. कोविडच्या उत्पत्तीबद्दल वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या वुहान संस्थेत शि झेंगली काम करत आहेत. वुहान शहरातील प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस लीक झाल्याचे आरोपही यापूर्वी झाले होते. दरम्यान, वुहान इन्स्टिट्यूट कोरोनाच्या उद्रेकासाठी जबाबदार नसल्याचं शी झेंगली यांनी म्हटलंय.
एका अहवालाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, ‘HKU5’ हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे. हाँगकाँगमधील जपानी पिपिस्ट्रेल वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला होता. हा व्हायरस मर्बेकोवायरस सबजीन पासून उद्भवतो. यामध्ये मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एमईआरएस) होणाऱ्या विषाणूचा समावेश आहे. हा विषाणू ACE2 रिसेप्टरशी संबंधित आहे. जो COVID-19 विषाणूद्वारे वापरला जातो. संशोधकांचे म्हणणे आहे की हा विषाणू मानवांमध्ये पसरण्याचा धोका जास्त आहे.
हेही वाचा – Jalna News : टिप्पर चालकाची एक चूक अन् झोपेतच मजूरांवर काळाचा घाला, पाच जणांचा मृत्यू; जालन्यात खळबळ