घरCORONA UPDATEचिंतेत भर! २९ देशांमध्ये पसरलायं कोरोना नवा व्हेरियंट, WHO ने व्यक्त केली...

चिंतेत भर! २९ देशांमध्ये पसरलायं कोरोना नवा व्हेरियंट, WHO ने व्यक्त केली भीती

Subscribe

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोवर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जातेय. परंतु संभाव्य लाटेबरोबरच देशात कोरोनाचे नवनवे घातक व्हेरियंट समोर येत आहेत. दरम्यान तब्बल २९ देशांमध्ये कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरियंट लॅम्ब्डा (Lambda)आढळून आला आहे. या नव्या व्हेरियंटमुळे जागतिक आरोग्य संघटनेने देखील चिंता व्यक्त केली आहे. मागील वर्षी पेरु देशामध्ये हा नवा व्हेरियंट सर्वप्रथम आढळून आला होता. त्याचा सर्वाधिक परिणाम दक्षिण अमेरिका देशांमध्ये झाला. त्यामुळे दक्षिण अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण वाढण्यासाठी लॅम्ब्डा (Lambda) हा व्हेरियंट असल्याचे समोर येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार(WHO), पेरु देशात या व्हेरियंटने सर्वाधिक धुमाकूळ घातला. एप्रिल २०२१ पासून या देशात ८१ टक्के कोरोना रुग्ण या व्हेरियंटशी संबंधित आहेत. तर चिलीमध्ये गेल्या दोन महिन्यात याच्याशी संबंधित ३२ टक्के रुग्ण आढळले आहेत. अर्जेंटीना आणि इक्वेडोर देशांमध्येही याचे बहुतांश रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

लॅम्ब्डा (Lambda)हा व्हेरियंटचा शरीरातील अँटीबॉडीवर कोणताही परिणाम होत नाही. परंतु याबाबत अधिक मिळवण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे WHO ने स्पष्ट केले आहे. दरम्यान कोणत्याही व्हेरियंटमुळे संक्रमित रुग्णांची संख्या वाढली की व्हेरियंट (व्हायरस) अधिक चिंताजनक बनत आहेत. परंतु त्या व्हेरियंटचा तपास, त्यावरील उपचार पद्धती आणि नंतर लसीच्या माध्यमातून विषाणूचा धोका कमी होतो असे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

जगभरात डेल्टा व्हेरियंटने जगाची चिंता वाढली असतानाच आता लॅम्ब्डा (Lambda)व्हेरियंट जगभर पसरण्याची भीती WHO ने व्यक्त केली आहे. सध्या ब्रिटनमध्ये गेल्या ११ दिवसांमध्ये डेल्टा व्हेरियंटमुळे रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. त्यामुळे डेल्टा व्हेरियंट आणि लॅम्ब्डा (Lambda)व्हेरियंटमुळे जगभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -