घरCORONA UPDATENew Covid Treatment Guidelines: कोरोनानंतर सततचा खोकला असू शकतो टीबी; स्टिरॉइडचा वापर...

New Covid Treatment Guidelines: कोरोनानंतर सततचा खोकला असू शकतो टीबी; स्टिरॉइडचा वापर टाळा

Subscribe

ज्या रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास होतोय आणि त्यांची ऑक्सिजन सेच्युरेशन 90-93 टक्क्यांच्या दरम्यान वारंवार बदलत असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते.

कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांबाबत केंद्राने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात म्हटले आहे की, डॉक्टरांनी कोरोना संक्रमित रुग्णांना स्टिरॉइड देणे टाळावे. यासोबतच औषधांच्या अतिसेवनाबद्दलही केंद्राने यात इशारा दिला आहे. अलीकडेच, कोरोनावर काम करणाऱ्या केंद्र सरकारच्या टास्क फोर्सच्या प्रमुखांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांवर केलेल्या औषधांच्या अतिवापराबद्दल दु:ख व्यक्त केले होते.

या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार, स्टिरॉइड्ससारखी औषधे जर जास्त प्रमाणात दीर्घ काळासाठी वापरली तर रुग्णांमध्ये अकाली म्युकरमायकोसिस किंवा ‘ब्लॅक फंगस’ सारख्या इतर संसर्गाचा धोका वाढतोय. यात जर खोकला दोन किंवा तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरु असेल तर रुग्णांनी टीबी आणि इतर संबंधित आजारांची तपासणी करून घ्यावी, अशी सुचना करण्यात आली आहे.

- Advertisement -

या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार, श्वास घेण्यास अडचण, हायपोक्सियाशिवाय विना अपर रेस्पिरेटरी ट्रँक्ट अशा लक्षणांना सौम्य आजार म्हणून वर्गीकृत केले जाईल. यामध्ये होम आयसोलेशन आणि काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय रूग्णांना श्वास घेण्यास त्रास झाला, 5 दिवसांपेक्षा जास्त काळ तीव्र ताप किंवा तीव्र खोकला अशा हलक्या लक्षणांचा सामना करणाऱ्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

ज्या रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास होतोय आणि त्यांची ऑक्सिजन सेच्युरेशन 90-93 टक्क्यांच्या दरम्यान वारंवार बदलत असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. या रुग्णांमध्ये हा आजार मध्यम मानला जातोय. मात्र त्यांना ऑक्सिजन सपोर्ट द्यावा. ज्यांचा श्वास घेण्याचा दर मिनिटाला ३० पेक्षा जास्त आहे, आणि श्वास घेण्यात अडचण येत आहे किंवा ऑक्सिजन सेच्युरेशन ९० टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांना गंभीर रुग्ण मानले जाईल. अशा रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करणे आवश्यक आहे. त्यांना रेस्पिरेटरी सपोर्टची आवश्यकता असते.

- Advertisement -

सुधारित मार्गदर्शक सुचना सौम्य ते गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये आपत्कालीन किंवा ‘ऑफ लेबल’ रेमडेसिव्हरचा वापर करण्यास परवानगी देत आहेत. हे फक्त अशा रुग्णांवर वापरले जाऊ शकते ज्यांना कोणतीही लक्षणे दिसल्याच्या 10 दिवसांच्या आत ‘रेनल’ किंवा ‘हॅप्टिक डिसफंक्शन’ची तक्रार नाही. मात्र जे रुग्ण कृत्रिमरीत्या ऑक्सिजनवर आहेत किंवा घरी आहेत त्यांच्यावर हे औषध वापरू नये, असा इशारा त्यात दिला आहे.

सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार, रोगाने गंभीरपणे प्रभावित झालेल्या रुग्णांसाठी आणि विशेषत: रोगाच्या तीव्रतेनंतर 24 ते 48 तासांच्या दरम्यान अतिदक्षता केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांवर टॉसिलिझुमाब हे औषध आपत्कालीन वापरासाठी वापरे जाऊ शकते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -