घरताज्या घडामोडीOmicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटवर मात करण्यास AstraZenecaचा बूस्टर डोस सक्षम

Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटवर मात करण्यास AstraZenecaचा बूस्टर डोस सक्षम

Subscribe

ओमिक्रॉन व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिन प्रभावशाली असल्याचा दावा केल्यानंतर आता अॅस्ट्राझेनेका/ऑक्सफर्ड लस ओमिक्रॉनविरोधात लढण्यासाठी सक्षम असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा फैलाव झाल्यानंतर जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांनी ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतात देखील १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान काल, बुधवारी ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस प्रभावी असल्याचा दावा केला होता. ओमिक्रॉनवर ८० टक्के कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस प्रभावी असून डेल्टावर १०० टक्के असल्याचा भारत बायोटेकने दावा केला होता. त्यानंतर आता नवी डेटानुसार अॅस्ट्राजेनेकाचा बूस्टर डोस वॅक्सजेवरिया (Vaxzevria) ओमिक्रॉनविरोधात सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पुनावाला यांनी ट्विट करून दिली आहे. (New data finds AstraZeneca booster generates higher antibodies against Omicron)

अदर पुनावाला यांना ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ही उत्साहवर्धक बातमी आहे. मुख्य अन्वेषक आणि ऑक्सफर्ड लस गटाचे संचालक प्रोफेसर अँड्र्यू जे पोलार्ड यांच्या म्हणण्यानुसार, नवीन डेटानुसार अॅस्ट्राझेनेका/ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्यांत तीन डोस ओमिक्रॉन विरोधात चांगले संरक्षण करतात असे दिसून आले आहे.

- Advertisement -

नवीन डेटानुसार, कोरोनाचे व्हेरिएंट बेटा, डेल्टा, अल्फा आणि गामा विरोधात अॅस्ट्राझेनेका/ऑक्सफर्डची लस प्रभावी आहे. तसेच ओमिक्रॉनविरोधातही चांगले अँटीबॉडीज तयार करण्यात देखील ही लस सक्षम आहे.

- Advertisement -

दरम्यान आतापर्यंत जगभरात १४९ देशांमध्ये ओमिक्रॉनचे ५ लाख ५२ हजार १९१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात २८ राज्य आणि केंद्राशासित प्रदेशात ओमिक्रॉन पसरला आहे. आतापर्यंत देशात १ रुग्णाचा मृत्यू ओमिक्रॉनमुळे झाला आहे.


हेही वाचा – Covaxin Booster Dose : कोव्हॅक्सिनच्या बूस्टर डोसने डेल्टा, ओमिक्रॉन होतोय निष्क्रिय, भारत बायोटेकचा दावा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -