घरअर्थजगतडेबिट-क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी, १ जुलैपासून बदलणार नियम

डेबिट-क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी, १ जुलैपासून बदलणार नियम

Subscribe

या नियमानुसार, व्यापारी आपल्या सर्व्हरवर ग्राहकांच्या कार्डचा डेटा संग्रहीत करू शकणार नाहीत. १ जुलैपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit card, Credit card) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ जुलैपासून तुमच्या कार्डची माहिती कुठेच जतन (सेव्ह) केली जाणार नाही. ग्राहकांची आर्थिक सुरक्षा लक्षात घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्यावर्षी डेबिट आणि क्रिडिट कार्डधारकांसाठी नवे नियम जारी केले होते. या नियमानुसार, व्यापारी आपल्या सर्व्हरवर ग्राहकांच्या कार्डचा डेटा संग्रहीत करू शकणार नाहीत. १ जुलैपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. (New debit card, credit card rules from july 1 2022 related to online transactions tokenisation)

हेही वाचा – आता आधार कार्डवरून मिळणार कर्ज, एसबीआयसह या बँका देत आहेत सुविधा, जाणून घ्या काय आहे योजना?

- Advertisement -

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड टोकनायझेशन नियम लागू केल्यामुळे, ऑनलाइन व्यापाऱ्यांना ग्राहकांचा डेटा, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक, CVV, कार्ड एक्सपायरी डेट आणि इतर संवेदनशील माहिती साठवण्याची परवानगी दिली जाणार नाही. या नियमाची अंमलबजावणी खरंतर 1 जानेवारी 2022 पासून होणार होती. मात्र, 1 जुलै 2022 पर्यंत सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती. म्हणजेच पुढील महिन्यापासून हा नियम लागू होणार आहे.

टोकनायझेशन अनिवार्य नाही

- Advertisement -

मात्र, कार्ड टोकनायझेशन प्रणाली अनिवार्य ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे तुमच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डची माहिती जतन करून ठेवायची आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता. कार्डची माहिती जतन न केल्यास, ग्राहकाला प्रत्येक वेळी ऑनलाइन वस्तू खरेदी करताना नाव, कार्ड क्रमांक आणि कार्डची वैधता यासारखे कार्डचे सर्व तपशील प्रविष्ट करावे लागणार आहेत.

हेही वाचा – स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, गोल्ड बाँड योजना २० जूनपासून सुरू

जर एखादा ग्राहक कार्ड टोकनायझेशनसाठी सहमत असेल, तर त्याला/तिला व्यवहार करताना फक्त CVV किंवा वन टाइम पासवर्ड (OTP) तपशील प्रविष्ट करावा लागेल. टोकन प्रणाली पूर्णपणे विनामूल्य आहे आणि ती एखाद्याच्या कार्ड डेटाच्या सुरक्षिततेसह सहज पेमेंट करून देते. तसेच टोकनायझेशन केवळ देशांतर्गत ऑनलाइन व्यवहारांसाठी लागू आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -