घरदेश-विदेशlunar and Solar Eclipse : जून ते जुलै दरम्यान दिसणार तीन ग्रहण!

lunar and Solar Eclipse : जून ते जुलै दरम्यान दिसणार तीन ग्रहण!

Subscribe

या ग्रहणांमध्ये एक सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण समाविष्ट असणार

कोरोना उद्रेक दरम्यान, या वर्षाच्या एका महिन्याच्या मध्यभागी तीन ग्रहण दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. या ग्रहणांमध्ये एक सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण समाविष्ट असणार आहेत. ही ग्रहण जून ते जुलै दरम्यान दिसतील. दरम्यान जूनमधील दोन ग्रहण आणि जुलैमध्ये एक ग्रहण असेल. या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण डिसेंबर २०१९ च्या सूर्यग्रहणानंतर २१ जून २०२० रोजी दिसणार आहे.

ज्योतिषांनी सांगितल्यानुसार, एका वर्षात तीनपेक्षा जास्त ग्रहणांना प्राणघातक मानले जाते, तर यावर्षी एकूण सहा ग्रहण दिसणार आहे. ज्योतिषाचार्य राजेश चतुर्वेदी यांनी असे म्हटले की, यंदा यावर्षी जानेवारी २०२० मध्ये चंद्रग्रहण सुरू झाले आहे तर यावर्षात २०२० मध्ये एकूण दोन सूर्यग्रहण आणि चार चंद्रग्रहण दिसणार आहेत. तसेच त्यांनी असे ही सांगितले, या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण २१ जून रोजी असेल तर दुसरे सूर्यग्रहण १४ डिसेंबर रोजी दिसणार आहे.

- Advertisement -

५ जून आणि ५ जुलै दरम्यान चंद्रग्रहण असणार आहे. त्यानंतर, ३० नोव्हेंबर २०२० रोजी पुन्हा चंद्रग्रहण दिसणार आहे. जूनमध्ये एक चंद्रग्रहण आणि एक सूर्यग्रहण लागल्यानंतर लगेत ५ जुलैला चंद्रग्रहण दिसणार आहे. ५ जून रोजी लागणारं चंद्रग्रहण हे रात्री ११ वाजून १६ मिनिटांपासून सुरू होईल, जे दुसर्‍या दिवशी म्हणजेच ६ जून रोजी सकाळी २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत असेल, असे सांगण्यात येत आहे.

तसेच, दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी हे चंद्रग्रहण पूर्ण होईल. या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास १५ मिनिटांचा असणार आहे. तर २१ जून रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असून हे ग्रहण संपुर्ण भारतात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण मृगशीरा नक्षत्र आणि मिथुन राशीमध्ये असणार असल्याचे ज्योतिषांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हे ग्रहण सकाळी १० वाजून १४ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत असणार आहे. या ग्रहणाचे वेध २० जूनच्या रात्री १० वाजून १४ मिनिटांपासून लागतील. त्यादरम्यान, लोकांनी घरात बसून देवाची पूजा करावी आणि घरी भजन करावे. याचा त्यांना फायदा होईल. यासह जुलैमध्ये दिसणारे हे ग्रहण देशात दिसणार नसल्याचेही ज्योतिषांकडून सांगण्यात येत आहे.


Cyclone Nisarga Live Update: येत्या १० तासांत वादळ कोकण किनारपट्टीला धडकणार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -