घरदेश-विदेशONDC ची Swiggy, Zomato ला टक्कर; कमी पैशांत मिळते जेवण

ONDC ची Swiggy, Zomato ला टक्कर; कमी पैशांत मिळते जेवण

Subscribe

 

नवी दिल्लीः ऑनलाइन फूडचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. घर बसल्या हवं ते मागवता येतं. यासाठीह वेळेचंही बंधन नसंत. यामध्ये  Swiggy आणि Zomato या कंपन्या आघाडीवर आहेत. यात आता ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) या कंपनीची भर पडली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही कंपनी स्वस्तात जेवण देते. त्यामुळेच एका दिवसांत या कंपनीने तब्बल १० हजार ऑर्डर डिलिव्हर केल्या.

- Advertisement -

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधून जेवण मागवायचं असल्यास त्याला डिलिव्हरी चार्ज लागतो. Swiggy आणि Zomato हे थर्ड पार्टी फूड डिलिव्हरी App आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे घेतले जातात.  ONDC थेट हॉटेल आणि रेस्टॉरंटशी कनेक्ट आहे. त्यामुळे फूड मागवणे स्वस्त पडते. सोशल मीडियावर ONDC ची खूपच चर्चा सुरु आहे. ONDC हे Swiggy आणि Zomato पेक्षा कसं स्वस्त आहे, याचा स्क्रीनशॉट अनेक जण सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सेम ऑर्डर, सेम प्लेस आणि सेम टाइम, पण किमतीत मात्र फरक, असे एकाने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

नुकताच swiggy ने सर्व वापरकर्त्यांकडून प्रति ऑर्डर 2 रुपये आकारण्याचा नियम लागू केला आहे. प्रत्येक ऑर्डरनुसार हे शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजे तुमच्या ऑर्डरच्या प्रमाणानुसार किंवा कार्ट मूल्यानुसार तुमच्याकडून शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच तुम्ही कार्टमध्ये पाच वस्तू ऑर्डर करा किंवा फक्त एक ऑर्डर करा, तुम्हाला त्या बाबतीत फक्त 2 रुपये शुल्क द्यावे लागेल.

- Advertisement -

मागील अनेक महिन्यांपासून फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीला व्यवसायात सतत तोटा होत होता. ज्याचा खर्चाचा बोजा कंपनीवर वाढत होता. अशा स्थितीत खाद्यपदार्थाचा दर्जा सुधारण्याबरोबरच त्याची किंमत कमी करण्याच्या उद्देशाने कंपनीने प्रति ऑर्डर 2 रुपये आकारण्याचा निर्णय घेतला. ऑनलाइन फूड ऑर्डरवर 2 रुपये आकारण्याचा नियम सध्या बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये लागू आहे. मात्र, मुंबई आणि दिल्लीच्या वापरकर्त्यांना सध्या जास्त पैसे मोजावे लागत नाही.स्विगीला दररोज 1.5 दशलक्षाहून अधिक ऑनलाइन ऑर्डर मिळतात. अशा परिस्थितीत, 2 रुपयांच्या शुल्कानुसार कंपनीला दररोज 30 लाख रुपये अतिरिक्त मिळतील. अशा प्रकारे कंपनी मासिक 9 कोटींहून अधिक कमाई करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -