घरCORONA UPDATE‘त्या’ रुग्णांचीच तपासणी होणार; कोरोना उपचारांच्या नियमांमध्ये बदल

‘त्या’ रुग्णांचीच तपासणी होणार; कोरोना उपचारांच्या नियमांमध्ये बदल

Subscribe

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर आता त्यांना १४ ऐवजी ७ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड-१९ उपचारानंतर रुग्णाला दिल्या जाणाऱ्या डिस्चार्जशी निगडीत नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. आता फक्त कोरोना विषाणूच्या गंभीर रूग्णांना डिस्चार्ज देण्यापूर्वी तपासलं जाणार आहे. मध्यम लक्षणं असलेले रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना चाचणीशिवाय डिस्चार्ज देण्यात येणार आहे. परंतु त्यांना सलग तीन दिवस ताप किंवा त्यांना ऑक्सिजनची गरज भासू नये, अशी अटही मंत्रालयाने ठेवली आहे. नवीन बदलांनुसार कोरोना संक्रमित रूग्णाची प्रकृती गंभीर झाली किंवा रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली, तर अशा रुग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांना आरटी-पीसीआर तपासणी करावी लागेल. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर आता त्यांना १४ ऐवजी ७ दिवस होम आयसोलेशनमध्ये रहावं लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारतात जुलैच्या उत्तरार्धात कोरोनाचे रुग्ण वाढणार; WHO च्या अधिकाऱ्याचा दावा


आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आता कोविड केअर फॅसिलिटीमध्ये दाखल करण्यात आलेल्या सौम्य आणि सुरूवातीची लक्षणं असलेल्या रुग्णांचं नियमित तापमान तपासलं जाणार आहे. तसंच पल्स मॉनिटरींगही करण्यात येईल. यासह त्यांना सलग तीन दिवस ताप नसेल, पुढील चार दिवस ऑक्सिजन सॅच्युरेशन ९५ टक्यांपेक्षा अधिक असेल आणि उपचार घेऊन १० दिवसांचा कालावधी लोटला असेल तेव्हाच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. जर कोणत्याही रुग्णाचं ऑक्सिजन सॅच्युरेशन ९५ टक्यांपेक्षा खाली आलं तर त्याला डेडिकेटेड कोविड केअरमध्ये दाखल करण्यात येईल. तसंच डिस्चार्जपूर्वी चाचणी केली जाणार नाही आणि त्यांना ७ दिवस होम आयसोलेशमध्ये रहावं लागणार आहे. मात्र, रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा ताप, कफ किंवा श्वास घेण्यास समस्या निर्माण झाल्यास त्यांना कोविड केअर फॅसिलिटी, राज्याचा मदत क्रमांक किंवा १०७५ या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -