घरताज्या घडामोडीइस्त्राईलनंतर बेल्जिअममध्ये कोविड-१९च्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, भारतात अलर्ट जारी

इस्त्राईलनंतर बेल्जिअममध्ये कोविड-१९च्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, भारतात अलर्ट जारी

Subscribe

दक्षिण आफ्रिकेमध्ये काल(गुरूवार) कोविड-१९चा नवीन आणि सुपर व्हेरिएंट आढळून आला होता. त्यामुळे येथील शास्त्रज्ञांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच हा व्हेरिएंट आता इतर देशांमध्ये सुद्धा पसरत आहे. इस्त्राईलनंतर बेल्जिअममध्ये कोविड-१९च्या नव्या व्हेरिएंटनं थैमान घातलं आहे. त्यामुळे भारतात सुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे. बेल्जिअममध्ये इजिप्त आणि तुर्कीमध्ये हा सुपर व्हेरिएंट आढळला आहे. तुर्की देशातील तरूणी ही इजिप्त देशातून आपल्या घरी परतली होती. परंतु अवघ्या ११ दिवसानंतर तिच्यामध्ये कोविड लक्षणं दिसू लागली. इस्त्राईलच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून आलेल्या तीन लोकांमध्ये नव्या व्हेरिएंटची लक्षणं आढळून आली आहेत.

बेल्जिअमचे पंतप्रधान एलेक्झांडर डी क्रू यांनी सांगितलं की, कोविड-१९ चा नवा व्हेरिएंट सापडल्यानंतर आम्ही नाईट क्लब तीन आठवड्यांपासून बंद केले आहेत. तसेच आम्ही लवकरात लवकर बार आणि रेस्टॉरंट सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेणार आहोत. दुसरीकडे फ्रान्सने ४८ तासांसाठी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. फ्रान्सचे आरोग्य मंत्री ओलिविअर वेरन यांनी सांगितलं की, काही आफ्रिका देशांमध्ये कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळून आल्यामुळे आम्ही मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

WHO च्या बैठकीनंतर संस्थेचे प्रवक्ते क्रिश्चिअन लिंडमेयर यांनी म्हटलं की, आम्ही निरीक्षण केलंय. या व्हेरिएंटमध्ये अनेक म्यूटेशन आहेत. याचा सखोल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. या कोविड-१९ च्या नवीन व्हेरिएंटचा प्रभाव किती आहे. हे समजून घेण्यासाठी आम्हाला पुढील काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. वैज्ञानिक या व्हेरिएंटला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. WHOकडून सुद्धा सरकारसाठी नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे ते अधिक सतर्क राहू शकतील.

भारतात अलर्ट जारी

हॉंगकॉंग आणि बोत्सवानामधून येणाऱ्या प्रवाशांना निर्देश जारी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना विशेष सतर्क राहण्याचे निर्देश जारी केले आहेत. दक्षिण आफ्रीका, हाँगकाँग आणि बोत्सवानामधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी कडक मार्गाने करण्यात यावी, असं निर्देश राज्याला देण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा: गडचिरोली जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याला गती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -