घरअर्थजगतपेन्शनबाबत बँकेला दिल्या नव्या सूचना, ज्येष्ठांना मिळणार दिलासा

पेन्शनबाबत बँकेला दिल्या नव्या सूचना, ज्येष्ठांना मिळणार दिलासा

Subscribe

केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनांबाबत निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन खाते चालू करण्यासाठी उपस्थिती दर्शवण्याची गरज लागणार नाही आहे.

केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने पेन्शन देण्याबाबत बँकांना सूचना दिल्या आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ट्वीट करत पेन्शनबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन खाते चालू करण्यासाठी उपस्थिती दर्शवण्याची गरज लागणार नाही आहे.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ट्वीट केलं की, पेन्शन आणि पेंशनर्स कल्याण विभागाने वृद्ध नागरिकांना सहज जीवन जगण्याच्या दिशेने एक वेगळा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने अशा सूचना दिल्या आहेत की पेन्शन खाते सक्रिय करण्यासाठी बँक पेन्शनरला काउंटरवर हजर राहणे गरजेचं नसणार आहे.

- Advertisement -


हेही वाचा – आमच्या प्रयोगशाळांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या रुग्णांचे नमुने नष्ट केले – चीन

- Advertisement -

दरम्यान, पेंशन घेणाऱ्यांना त्यांच्या पहिल्या निवृत्तीवेतनासाठी वैयक्तिकपणे बँकेत जाण्याची देखील आवश्यकता नाही. या व्यतिरिक्त पेन्शनधारकांना पेन्शन खाते सक्रिय करण्यासाठी बँकेत हजर राहण्याची गरज भासणार नाही. त्याच वेळी, कार्मिक मंत्रालयाने अशी माहिती दिली की बँका पेन्शन देण्याकरिता किंवा पेंशनधारकांकडून वेगवेगळी प्रमाणपत्रे घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहेत. यासंदर्भात मंत्रालयाने पेन्शन वितरित बँकांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

बँकांना सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटर (सीपीपीसी)/बँक शाखांमध्ये अद्ययावत केलेल्या नियम आणि सूचनांबाबत संवेदनशील करण्यास सांगितले गेलं आहे. कार्मिक मंत्रालयांतर्गत निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतन कल्याण विभागामार्फत प्राप्त झालेल्या तक्रारींचे विश्लेषण केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -