घरCORONA UPDATEचीनमध्ये नव्या कोरोनाचा धूमाकूळ

चीनमध्ये नव्या कोरोनाचा धूमाकूळ

Subscribe

चीनमधील ज्या वुहान शहरात कोरोना व्हायरसचा जन्म झाला त्याच ठिकाणी आता एका नव्या कोरोना व्हायरसने जन्म घेतला आहे. यामुळे कोरोनाच्या महासंकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा हाहाकार उडाला आहे. या नव्या व्हायरसला एसिम्टोमॅटिक म्हणजे S असे नाव देण्यात आले असून तो अधिक आक्रमक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. सध्या वुहानमध्ये ५० हून अधिक जणांना या नव्या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

हा व्हायरस वुहानमधून हुबई प्रांतात पोहचला आहे. पण या नव्या कोरोनाची लक्षण ही लक्षात येण्यासारखी नसल्याने येत्या काही दिवसात चीनमध्ये या नव्या कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. चीनमध्ये नव्या रुपात परतलेल्या नव्या कोरोना व्हायरसची चाचणी केल्यानंतर जानेवारीत चीनमध्ये संसर्ग करणारा व्हायरस आणि हा नवीन व्हायरस यांच्यात फरक असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर जुन्या व्हायरसला L सिम्टोमॅटिक व नव्या व्हायरसला S असे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत सर्दी, खोकला , ताप ही कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची लक्षणं असल्याचे सांगितले जात होते. पण आता या नव्या व्हायरसची कुठलीच लक्षण नसल्याने अनेकांना आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचेच कळत नाही. यामुळे या व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. एसिम्टोमॅटिक म्हणजेचा लक्षण नसलेला कोरोनारुग्ण. यामुळे डॉक्टरांपुढेही नवे आवाहन उभे राहीले आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वीच चीनने कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केला होता. त्यानंतर अनेक शहरांतून लॉकडाऊन मागे घेत चीन कोरोनामुक्त झाल्याचे जगजाहीर केले. ऑफिसेसही सुरू करण्यात आले असून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न चीन करत आहे. मात्र एसिम्टोमॅटिक व्हायरसने चीनला पुन्हा आव्हान दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -