Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'संसदेची नवीन इमारत सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी'; काँग्रेस-तृणमूलचा मोदींवर गंभीर आरोप

‘संसदेची नवीन इमारत सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी’; काँग्रेस-तृणमूलचा मोदींवर गंभीर आरोप

Subscribe

नवी दिल्लीत बांधण्यात आलेली नवीन संसद भवन ही आफ्रिकन देश सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आलेली आहे. याबाबतचे ट्वीट तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार आणि काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

रविवारी (ता. 28 मे) देशातील लोकशाहीचे मंदिर असलेल्या नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यावरून मोठे राजकारण झालेले पाहायला मिळाले. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते न झाल्याने या कार्यक्रमाला देशातील 20 विरोधी पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यामुळे या कार्यक्रमावरून वाद देखील झाला. नवीन संसद भवनाचे उद्घाटन होऊन तीन दिवस झालेले असले तरी अद्यापही विरोधकांकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. नवी दिल्लीत बांधण्यात आलेली नवीन संसद भवन ही आफ्रिकन देश सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आलेली आहे. याबाबतचे ट्वीट तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार आणि काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

हेही वाचा – पाहा : अशोकचक्रापासून ते चाणाक्य, आंबेडकरांपर्यंत नव्या संसद भवनातील अप्रतिम कलाकृती!

- Advertisement -

सर्वात पहिल्यांदा तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “सोमालिया देशाने नाकारलेली संसद भवन ही नव्या भारताची प्रेरणा आहे. गुजरातमधील मोदींच्या पाळीव आर्किटेक्टने सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी करण्यासाठी 230 कोटी रुपये आकारले आहेत.” असे ट्वीट जवाहर सरकार यांनी केल्यानंतर त्यांचे हे ट्वीट दिग्विजय सिंह यांनी रिट्वीट केले आहे.

- Advertisement -

खासदार दिग्विजय सिंह यांनी जवाहर सरकार यांचे हे ट्वीट रिट्वीट करत लिहिले की, ” जवाहर सरकार यांना पैकीच्या पैकी गुण. तुम्हालाही असं वाटतं का, “सोमालियाने नाकारलेली हे संसद भवन आपल्या पंतप्रधानांसाठी प्रेरणा आहे. कॉपीकॅट आर्किटेक्टकडून 230 कोटी रुपये वसूल करायला हवेत,” असे म्हणत दिग्विजय यांनी टोला लगावला आहे.

त्यामुळे आता या ट्वीटमुळे पुन्हा एकदा संसद भवनामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारण विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या संसद भवनाच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले होते की, ज्यावेळी नवीन संसद भवनाची चर्चा करण्यात आली, तेव्हा काही ठराविक लोक सोडली तर कोणालाही याबाबतची माहिती नव्हती. तर संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण हे व्हॉटसअॅपवर देण्यात आले होते, असे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे संसद भवनाचा वाद हा काही नवीन नसून गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरू आहे. पण आता या एका नव्या माहितीमुळे हा वाद किती विकोपाला जातो, हे पाहण तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -