घरदेश-विदेशनवीन संसद भवन उद्घाटन महासोहळा : नऊ वर्षे नवनिर्माणाचे, गरीब कल्याणाचे -...

नवीन संसद भवन उद्घाटन महासोहळा : नऊ वर्षे नवनिर्माणाचे, गरीब कल्याणाचे – PM मोदी

Subscribe

भाजपला सत्तेत येऊन 09 वर्षे पूर्ण होत आहेत. याचबाबत बोलताना नरेंद्र मोदी यांच्याकडून माहिती देण्यात आली. भाजपची नऊ वर्षे नवनिर्माणाची असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

आज (ता. 28 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील लोकशाहीचे मंदिर म्हंटल्या जाणाऱ्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम दोन टप्प्यात पार पडला. पहिल्या टप्प्यामध्ये पुजा आणि सर्वधर्मियांची प्रार्थना झाली. त्यावेळी मोदींच्या हस्ते लोकसभेमध्ये पवित्र अशा सेंगोलची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या नव्या संसद भवनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी त्यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळाबद्दल माहिती देत घडलेले बदल सांगितले.

हेही वाचा – स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवात देशाला नवीन संसद मिळाली – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisement -

भाजपला सत्तेत येऊन 09 वर्षे पूर्ण होत आहेत. याचबाबत बोलताना नरेंद्र मोदी यांच्याकडून माहिती देण्यात आली. भाजपची नऊ वर्षे नवनिर्माणाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘कोणत्याही तज्ज्ञाने गेल्या नऊ वर्षांचे मूल्यमापन केले, तर ही नऊ वर्षे गरिबांच्या कल्याणाची असल्याचे लक्षात येईल. गेल्या नऊ वर्षांत गरिबांसाठी चार कोटी घरे बांधल्याचे समाधान आहे. डोके उंचावलेल्या या भव्य इमारतीकडे पाहिल्यावर नऊ वर्षांत 11 कोटी शौचालये बांधली गेल्याचा अभिमान वाटतो. आज जेव्हा आपण या संसद भवनातील सुविधांबद्दल बोलत आहोत, तेव्हा मला अभिमान वाटतो की आम्ही गावे जोडण्यासाठी चार लाख किमीपेक्षा जास्त रस्ते बांधले आहेत. आज ही पर्यावरणपूरक वास्तू पाहून समाधान वाटत असताना, चार वर्षांत आम्ही अमृत सरोवर बांधले याचा मला अभिमान वाटतो. आम्ही 30000 हून अधिक पंचायत इमारती देखील बांधल्या आहेत. म्हणजेच पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत आमची निष्ठा एकच आहे. आमची प्रेरणाही तीच आहे. देशाचा विकास, देशातील जनतेचा विकास करण्याचे आमचे ध्येय आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

नवीन संसद भवन नवीन सुविधांनी सुसज्ज आहे. यावेळीही सूर्यप्रकाश थेट येत असल्याचे पाहायला मिळते. तंत्रज्ञानाकडे पूर्ण लक्ष दिले आहे. आज सकाळी मी संसदेचे बांधकाम करणाऱ्या कारागीरांना भेटलो. सुमारे 60 हजार मजुरांना या संसदेच्या बांधकामामुळे रोजगार मिळाला आहे. त्यांनी या नवीन इमारतीसाठी घाम गाळला आहे. त्यांच्या श्रमाला वाहिलेली डिजिटल गॅलरी संसदेतही निर्माण झाली याचा मला आनंद आहे. हे जगात पहिल्यांदाच घडले असावे. संसदेच्या उभारणीतील त्यांचे हे योगदानही अजरामर झाले आहे, असेही मोदी यांनी संबोधित करताना सांगितले.

- Advertisement -

तर, नवीन संसद भवन आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या संकल्पना साकार करत आहे. ही नवी संसद आत्मनिर्भर भारताच्या सुर्योदयाची साक्षीदार होईल. विकसित भारताच्या संकल्पांची सिद्धी होताना पाहील. नूतन आणि पुरातनाच्या सहअस्तित्वाचा आदर्श बनेल. भारत जेव्हा विकास करतो, पुढे जातो, तेव्हा हे विश्वदेखील पुढे सरकत, असे मोदींकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -