घर देश-विदेश नवीन संसद भवन उद्घाटन महासोहळा : PM मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितले...

नवीन संसद भवन उद्घाटन महासोहळा : PM मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितले सेंगोलचे महत्त्व

Subscribe

नव्या संसद भवनाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांनी पहिले भाषण करत देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सेंगोलचे महत्त्व सांगितले. सेंगोल सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

देशाच्या संसदेच्या नव्या वास्तूचं राष्ट्रपतींना या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नाही तसचं, राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होत नसल्यामुळे 20 विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नवीन संसद भवन चर्चेत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता. 28 मे) संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना लोकसभेच्या दालनात ऐतिहासिक सेंगोलचीही स्थापना केली. या ऐतिहासिक वास्तूचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांनी पहिले भाषण करत देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सेंगोलचे महत्त्व सांगितले. सेंगोल सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. (PM Modi while addressing the nation spoke about the importance of Sengol)

हेही वाचा – नवीन संसद भवन उद्घाटनानंतर राहुल गांधींचं पहिलं ट्विट, मोदींना म्हणाले…

- Advertisement -

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “आज या ऐतिहासिक प्रसंगी, काही काळापूर्वी संसदेच्या या नवीन इमारतीत पवित्र सेंगोलची स्थापनाही करण्यात आली होती. ग्रेट चोल साम्राज्यात, सेंगोल हे कर्तव्याचा मार्ग, सेवेचा मार्ग, राष्ट्राच्या मार्गाचे प्रतीक मानले जात असे. राजाजी आणि अधिनाम मठाच्या संतांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंगोल सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनले. तामिळनाडूहून खास आलेले अधिनाम मठाचे संत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आज सकाळी संसद भवनात हजर झाले. मी पुन्हा एकदा त्यांना नमन करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेत या पवित्र सेंगोलची स्थापना करण्यात आली आहे. यापूर्वीही यासंदर्भातील अनेक माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. आम्ही या पवित्र सेंगोलची प्रतिष्ठा, मान-सन्मान परत करू शकलो हे मी आमचे भाग्य समजतो.”

तर, ‘जेव्हा या संसद भवनात कामकाज सुरू राहील, तेव्हा हे सेंगोल आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील, असे मत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. तसेच, भारत हे फक्त लोकशाही राष्ट्रच नाही. तर लोकशाहीची जननीही आहे. मदर ऑफ डेमोक्रसीही आहे. भारत हा आज जागतिक लोकशाहीचा मोठा आधार आहे. लोकशाही ही केवळ आपल्यासाठी एक व्यवस्था नाही, ती एक संस्कृती, एक कल्पना, परंपरा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

आपले वेद आपल्याला सभांबाबत आणि समित्यांच्या लोकशाहीबाबत आदर्श आहेत. गण सारख्या शब्दांचा उल्लेख महाभारतासारख्या ग्रंथात आढळतो. तामिळनाडूत सापडलेला इ.स. 900 चा एक शिलालेखही हेच शिकवतो. आपली राज्यघटना हाच आपला संकल्प आहे. या ठरावाचा कोणी सर्वोत्तम प्रतिनिधी असेल तर ती आपली संसद आहे आणि ही संसद देशाच्या समृद्ध संस्कृतीची घोषणा करते जी ती संकल्प करते – चरैवेती, चरैवेती. असे मोदी यांच्याकडून संबोधित करताना सांगण्यात आले.

- Advertisment -