घरताज्या घडामोडीVIDEO : नवीन संसदेचा फर्स्ट लूक; सर्व माजी पंतप्रधानांचे फोटो, 1224 खासदार...

VIDEO : नवीन संसदेचा फर्स्ट लूक; सर्व माजी पंतप्रधानांचे फोटो, 1224 खासदार बसतील एवढी आसन क्षमता

Subscribe

१२२४ खासदार बसतील एवढी या आसनक्षमता नवीन संसदेची आहे. ६४,५०० वर्ग मीटर एवढ्या भव्य परिसरात हे संसद भवन उभे राहिले आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती टाटा समुहाने या इमारतीचे निर्माणकार्य केले आहे

नवी दिल्ली – नवीन संसदेचे २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ही नवीन संसद दिसते कशी, याची सर्वांनाच उत्सूकता आहे. नवीन संसदेचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

१२२४ खासदार बसतील एवढी या आसनक्षमता नवीन संसदेची आहे. ६४,५०० वर्ग मीटर एवढ्या भव्य परिसरात हे संसद भवन उभे राहिले आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती टाटा समुहाने या इमारतीचे निर्माणकार्य केले आहे. चार मजली या इमारतीच्या निर्माणासाठी ९७० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

- Advertisement -

नवीन संसदेत ग्रंथालय, संग्रहालय, भोजन कक्ष देखील असणार आहे. त्यासोबत भारताच्या प्राचीन इतिहासाचेही दर्शन तुम्हाला येथे होणार आहे. महिला आणि आदिवासी क्रांतिकारकांचीही झलक संसदेत पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

महत्मा गांधी आणि आतापर्यंतच्या पंतप्रधानांची तैलचित्रे येथे लावण्यात आली आहेत.

नवीन संसद निर्माण, जुन्या संसदेची दुरुस्ती आणि देखभाल याशिवाय वारसास्थळ वास्तूंची दुरुस्ती या संपूर्ण प्रोजेक्टला सेंट्रल व्हिस्टा हे नाव देण्यात आले आहे. याचे एकत्रित बजेट १३,५०० कोटी रुपये आहे.

संसद उद्घाटनाचा वाद
देशाचं नवं संसद भवन जवळपास अडीच वर्षांत तयार झालं आहे. २८ मे नवीन संसदेचं उद्घघाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेचं उद्घघाटन करणार आहेत.

संसदेचं उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे, अशी काँग्रेससह २०हून अधिक विरोधी पक्षांची मागणी आहे. पंतप्रधानांनी उद्घाटन करण्याला या पक्षांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख आहेत, त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेचं उद्घाटन झालं पाहिजे, अशी भावना विरोधकांनी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
संसदेच्या उद्घाटनला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. हा संविधानाचा अपमान आहे. संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी याचिका दाखल करण्यात आली. शुक्रवारी सकाळीच या याचिकेवर सुनावणी झाली, आणि याचिका फेटाळण्यात आली.

लोकसभा सचिवालयाविरोधात आणि त्यासोबतच गृहमंत्री, कायदा मंत्री यांना पार्टी करुन अॅड. जया सुकिन यांनी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी याचिका दाखल केली होती.

हेही वाचा : Sengol : नवीन संसदेतील राजदंडाबाबत काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -