घरदेश-विदेशNew Parliament : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवे संसद भवन 28 मे...

New Parliament : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवे संसद भवन 28 मे रोजी राष्ट्राला समर्पित

Subscribe

नवी दिल्ली : नवीन संसद भवनाचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या 28 मे 2023 रोजी हे नवे संसद भवन (new Parliament) राष्ट्राला समर्पित करणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, चार मजली संसद भवनात केवळ मंत्री आणि पक्षांसाठीच नव्हे तर, खासदारांनाही स्वतःची खोली असेल. जुन्या संसदेच्या तुलनेत या संसद भवनात खूप बदल करण्यात आले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने (NIFT) डिझाइन केलेल्या नवीन पोशाखांमध्ये संसदेशी संलग्न मार्शल आणि कर्मचारी येथे दिसतील.

- Advertisement -

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी सरकारला संसदेसाठी नवीन इमारत बांधण्याची विनंती केली होती. यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. विविध वैशिष्ट्ये असलेले नवे संसद भवन विक्रमी वेळेत बांधण्यात आले आहे. भारताच्या वैभवशाली लोकशाही परंपरा आणि घटनात्मक मूल्ये अधिक समृद्ध करणारे हे नवे संसद भवन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असल्याने येथील कामकाज आणखी प्रभावीपणे चालेल, अशी अपेक्षा आहे. हे जुन्या संसद भवनापेक्षा 17,000 चौरस मीटर मोठे बांधले गेले आहे.

- Advertisement -

संसदेच्या सध्याच्या इमारतीत लोकसभेत 550 तर राज्यसभेत 250 सदस्य बसण्याची व्यवस्था आहे. नव्या संसद भवनाची उभारणी करताना भविष्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांत खासदारांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे. यात एकूण 1 हजार 224 खासदारांसाठी आसनव्यवस्था आहे. संसदेच्या नव्या वास्तूत लोकसभेत 888 आणि राज्यसभेत 384 सदस्यांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन लोकसभेच्या चेम्बरमध्ये होणार आहे.

वस्तुत: 1971पासून लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची संख्या वाढलेली नाही. हा आकडा 33 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या विचारावर अनेकदा चर्चा झाली. पण निर्णय झाला नाही. सध्या 2.5 दशलक्ष लोकसंख्येमागे एक खासदार असून जो जगात सर्वाधिक आहे. नवीन संसद भवनात सेंट्रल हॉल नसेल, त्याऐवजी कमिटी हॉल असेल. यामध्ये एक अतिशय सुंदर संविधान कक्ष बनवण्यात आला आहे. याशिवाय विश्रामगृह, वाचनालय, कॅन्टीन आदी सुविधा उपलब्ध असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -