Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश मोक्षप्राप्तीचा नवा पतंजली उद्योग, ठाकरे गटाची बाबा रामदेव यांच्यावर टीका

मोक्षप्राप्तीचा नवा पतंजली उद्योग, ठाकरे गटाची बाबा रामदेव यांच्यावर टीका

Subscribe

मुंबई : प्रख्यात उद्योगपती, योगाचार्य बाबा रामदेव यांनी सांगितले की, जे सनातनला शिव्या देत आहेत, त्यांना 2024 साली मोक्ष मिळेल. उद्योगपती रामदेव यांनी हे मोक्षपुराण काशी येथे सांगितले. रामदेव यांनी ही ‘मोक्ष’ उद्योगाची घोषणा ‘इंडिया’ आघाडीस उद्देशून केली. बाबांनी मोक्षप्राप्तीचा नवा पतंजली उद्योग सुरू केला असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – …हेदेखील सनातन सत्य आहेच, ठाकरे गटाचे भाजपावर शरसंधान

- Advertisement -

बाबा रामदेव यांनी काशीमध्ये बोलताना ‘मोक्ष’ कोणाला व कसा मिळेल यावर प्रवचन दिले. जे ‘सनातन’ला शिव्या देत आहेत त्यांना 2024 मध्ये ‘मोक्ष’ मिळेल, असे ते म्हणाले. काशी हे महातीर्थ आहे. विद्या आणि मोक्षाची नगरी आहे. काशी ही सत्यनगरीसुद्धा आहे. त्यामुळे बाबा सत्य बोलले असतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अशा नगरीत येऊन उद्योगपती रामदेव यांनी ‘मोक्ष’ देण्याच्या नव्या उद्योगाची घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या पतंजली उद्योगसमूहास मोठीच बरकत येईल, अशी कोपरखळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखातून दिली आहे.

पतंजली उद्योगात बाबा रामदेव यांनी कोरोना निवारणाचे औषध बाजारात आणले होते, पण काशीच्या मोक्षप्राप्ती नगरीत गंगेत प्रेतांचे खच वाहतानादेखील लोकांना दिसले होते. हृदयविकारावर रामबाण औषध त्यांनी शोधले, पण बाबांच्याच पतंजलीचे संचालक आचार्य बाळकृष्ण यांना हृदयविकाराचा झटका येताच प्राण वाचविण्यासाठी त्यांना दिल्लीतील इस्पितळात दाखल करावे लागले, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्र काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय; श्रीनगरमध्ये ‘ हम सब एक है’ विशेष कार्यक्रम

रामदेव बाबांनी ‘मोक्ष’प्राप्तीकडे मोर्चा वळवला. मुळात मोक्ष मिळविण्यासाठी पाच गोष्टींचे पालन करावे लागते. सगळ्यात पहिले चोरी न करणे, खोटे न बोलणे, व्यभिचार न करणे, हिंसा न करणे आणि मोहमायेपासून दूर राहणे. हे ज्याने केले त्यालाच मोक्षाचे दार उघडते. या मोक्ष उद्योगाचे ‘पेटंट’ पंतप्रधान मोदी यांनी उद्योगपती बाबा रामदेव यांना दिले असेल तर 2024 साली हा ‘मोक्ष’ उद्योग साफ कोसळून पडणार आहे! अर्थात आज सत्तेवर असलेल्या नकली हिंदुत्ववाद्यांना मोक्षप्राप्ती होणे कठीणच आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

गुजरात, महाराष्ट्र वगैरे राज्यांतील हिंदू मंदिरांवर मोगलांची आक्रमणे झाली. सोमनाथ वगैरे मंदिरे उद्ध्वस्त झाली. अयोध्येवरही आक्रमण झाले, पण तामीळनाडूच्या भूमीवरील सर्व मंदिरे या आक्रमणापासून बचावली हे त्या सनातन धर्माचे यश. त्यामुळे उद्योगपती रामदेव बाबा व भाजपच्या लोकांना सनातन धर्माविषयी जी चिंता वाटते आहे ती पोकळ तर आहेच, परंतु भंपकदेखील आहे. कारण त्यात राजकीय स्वार्थ व पेटवापेटवीशिवाय दुसरे काही नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – मोडलेला कणा अन् विकलेला खांदा!

‘द्रविडी’ पक्ष सनातन धर्म मानत नाहीत हा त्यांचा राजकीय विचार आहे, पण तामीळ जनांत हिंदू संस्कृती खोलवर रुजली आहे. हे राज्य म्हणजे हिंदुत्वाचा खजिना आहे. स्वर्गात जर 33 कोटी देव असतील तर त्या सर्व देवांची मंदिरे तामीळनाडूत आहेत. तिरुनेलवेली येथे पापनासम मंदिर आहे. एखाद्याची पापे धुऊन काढायची तर येथे जायचे अशी प्रथा आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीनंतर सध्याच्या राज्यकर्त्यांना याच पापनासम मंदिरात जावे लागेल व त्या विधीचे पौरोहित्य उद्योगपती बाबा रामदेव यांना करावे लागेल, अशी कोपरखळीही ठाकरे गटाने लगावली आहे.

- Advertisment -