घरदेश-विदेशब्रिटनमध्ये ५ सप्टेंबरला ठरणार नवे पंतप्रधान, ऋषी सुनकही शर्यतीत

ब्रिटनमध्ये ५ सप्टेंबरला ठरणार नवे पंतप्रधान, ऋषी सुनकही शर्यतीत

Subscribe

पंतप्रधान पदासाठी ११ उमेदवार रिगंणात असून भारतीय वंशाचे ऋषी सुनक हेसुद्धा पंतप्रधान पदासाठी दावेदार आहेत.

युकेच्या नव्या पंतप्रधानांची (New Prime Minister in UK) घोषणा ५ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती ब्रिटनमधील सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाने दिली. तोपर्यंत बोरिस जॉन्सन हे पदभार सांभाळतील. दरम्यान, पंतप्रधान पदासाठी ११ उमेदवार रिगंणात असून भारतीय वंशाचे ऋषी सुनक हेसुद्धा पंतप्रधान पदासाठी दावेदार आहेत. (New prime minister will be declare on 5 September, Rushi Sunak in the race)

हेही वाचा – देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

- Advertisement -

कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार ख्रिस पिंचर यांनी लंडनमधील एका खासगी क्लबमध्ये दोन पुरुषांना आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला होता. त्यामुळे ख्रिस पिंचर यांच्याच पक्षातील खासदारांनी बोरिस जॉन्सनविरोधात बंड केले होते. यामुळे सरकारच्या ५० हून अधिक सदस्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही त्यांचा पदाचा राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान, संसदेतील १९२२ समितीने पक्षाच्या नेतृत्व निवडणुकीचे वेळापत्रक तयार केले आहे. मंगळवारपर्यंत पंतप्रधानपदासाठी इच्छूक असलेल्यांचे नामांकन अधिकृतपणे उघड केले जाईल. त्यानंतर ५ सप्टेंबरला पंतप्रधानांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती १९२२ समितीचे अध्यक्ष ग्रॅहम ब्रॅडी यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – जेम्स वेब टेलिस्कोपने टिपली अवकाशातील काही खास दृश्य

भारतीय वंशाचे ऋषी सुनक

बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधानच्या शर्यतीत आहे. त्यांची पंतप्रधानपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -